पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११० )

त्यानें भावी अरिष्टांमधून आपली मुक्तता करून घेतली; परंतु अदिलशहा त्याच्याप्रमाणें बादशहास शरण आला नाही. तेव्हा शहाजहान यानें शहाजी- 'चरील जोराच्या मोहिमेचें कार्य तात्पुरतें बाजूस ठेवून, विजापूरकरांवर तीन बाजूंनी एकदम सैन्य रवाना केले. ह्रीं सैन्ये विजापूरकरांच्या हद्दीत शिरल्यावर त्यांनी तिकडे अतिशय धुमाकूळ माजविला; अनेक शेतांची नासाडी केली; घरेदारें जाळिलीं; गुरे ढोरें हरण केलीं; ठिकठिकाण अनेक लोकांच्या कत्तली उडविल्या; पुष्कळ लोकांस पकडून गुलाम केले; अनेक शहरें, गांवें, व किल्ले ताब्यांत घेतले; अनेक गांवें बेचिराख केली; अशा रीतीनें निरनिराळ्या प्रकारानें भयंकर प्रळय उडवीत ह्रीं सैन्यें राजधानांवर चाल करून आली; तरी सुद्धां अदिलशहानें न डगमगतां मोंगली सैन्याशी निकराचा सामना केला; व अखेरीस शहापूरच्या तलावाचा बांध फोडून विजापूरच्या आसपासचा सर्व प्रदेश जलमय करून टाकिला; त्यामुळे मोंगली फौजा निरुपाय होऊन तशाच परत फिरल्या; व त्यांनी पुन्हां विजापूरच्या राज्यांत लुटालूट आरंभिली; तेव्हां अदिलशाही सेनापती रणदुल्ला- खान त्यांच्यावर चाल करून गेला; व केव्हां त्याची तर केव्हां मोंगलांची सरशी होत जाऊन हैं युद्ध कांहीं दिवस तसेंच चालू राहिलें.

 बादशहा शहाजहान हा जसा निष्णात योद्धा होता, तसाच तो राज- कारण निपुण मुत्सद्दीही होता. म्हणून पुढे लढाईचा हंगाम फारच थोडा शिल्लक असून लवकरच पावसाळा लागणार, त्या पूर्वीच शहाजीचा बंदोबस्त करावा, असें त्याने ठरविलें. यावेळी महंमद अदिलशहा वयांत आल्यासारखा असून तो स्वतः – शहाजीचे पुरस्कर्ते खवासखान व मुरारपंत या उभयतांना बाजूस ठेवून – नवीन मंत्र्यांच्या साह्याने राज्यकारभार पहात होता; ही गोष्ट शहाजहान यांस समजली होती; म्हणून त्यानें प्रत्यक्ष अदिलशहाशींच समेटाचें


पुढे इंग्लिशांनी पकडले. इ. सन १८४१ मध्ये इंग्लिशांनी या किल्लयांत चिनी कैदी ठेविले होते; व पुढे इ. सन १८४५मध्यें राघोजी भांगरे यानें बंड केले, त्यावेळी इंग्लिशांनी आपल्या सैन्याची एक तुकडी या किल्लपांत आणून ठेविली होती. हा किल्ला अद्यापि बन्याच सुस्थितीत आहे.