पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०९ )

 मध्यंतरी शहाजहान बादशहाची, शहाजी व अदिलशाही राज्याविरु द्धची, ही सर्व प्रचंड तयारी पाहून गोवळकोंडेकर अब्दुल्ला कुत्बशहा हा घाब- रून गेला; त्यानें बादशहास शरण जाऊन त्याचे स्वामित्व मान्य केले; व त्यास दरसाल खंडणी देण्याचें कबूल केले. मोंगल बादशहाची ताबेदारी पत्करून


आहेत. किल्लघांत "कोळी चौथरा" या नांवाचा एक फरसबंदी चौथरा आहे; इ० सन १६५०च्या सुमारास पुणे प्रांतांतील कोळी लोकांनी फार मोठे बंड केले; त्यावेळी मोंगलांनी आपले सैन्य पाठवून त्यांचा पराभव केला; हजारों लोक कैद केले, व हजारों कोळ्यांची डोकी उडविली; त्यांची ज्या ठिकाणी कत्तल केली, त्या ठिकाणांस " कोळी चौथरा " असे म्हणतात. त्याप्रमाणेंच किल्लया- खालीं " पंच लिंगाचें स्थान " आहे. इ० सन १७७७ मध्ये नाना फडणि- साचा मेहुणा बळवंतराव बडे यानें पांच बंडखोर व फरारी झालेल्या कोळ्यांना पकडून किल्लयाखाली ठार मारिलें; ते पिशाच्चरूपानें त्याच्या पाठीस लागले; तेव्हां त्यांना शांत करण्याकरिता त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांच्या नांवानें पांच लिंगे स्थापन करून त्यांवर एक देवालय बांधिलें, त्यांस "पंचलिंगाचें स्थान" म्हणतात. इ. सन १६५७ मध्ये शिवाजीनें जुन्नरवर स्वारी करून अकरा लाख रुपयांची लूट मिळविली; व इ० सन १६७० व इ. सन १६७५ या दोन वर्षी शिवाजीनें शिवनेरी किल्ला हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यास यश आलें नाहीं; पुढे इ. सन १७१६ मध्यें छत्रपति शाहू याच्या कारकीर्दीत मराठ्यांनी तो मोंगलापासून इस्तगत करून घेतला. इ. सन १७९३ मध्ये राघोबा दादाचे चिरंजीव द्वय बाजीराव व चिमणाजी या उभयतांना नाना फडणिसाने जुन्नरच्या गडीत प्रतिबंधांत ठेविलें होतें. इ. सन १७९५ मध्ये सवाई माधवराव मृत्यू पावल्यावर परशुरामभाऊ पटवर्धन जुन्नरास आला; व " गाईचें शेपूट धरून " शपथ विधी होऊन पुढे दुसरा बाजीवर पेशवाई पदावर आला. इ. सन १८१८ मध्यें, मेजर एड्रिज हा बाजीरावाचा पाठलाग करीत जुन्नर येथे येऊन त्यानें ता० २१ मे रोजी शिवनेरी किल्ला हस्तगत करून घेतला. येथें अण्णाभाई रत्तीकर या नांवाचा एक किल्लेदार होता; तो आधींच इडसरच्या किल्लयावर पळून गेला होता; त्यास