पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचा इतिहास.
भाग चौथा
क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत
शहाजी राजे.


परिच्छेद पहिला


भोसले घराण्याची पूर्वपीठिका.
तुझे मनोरथ सिद्धीस जातील; व तुझें वंशी
"श्री सांबाचा अवतार, शककर्ता निर्माण होईल. "

- तुळजापूर येथील देवीचा मालोजीस झालेला दृष्टांत.

 भोसल्यांचे घराणें, हैं दक्षिणेंतील इतिहासप्रसिद्ध मराठा घराण्यांतील "अतिशय प्रसिद्ध व पुरातन असून, हें क्षत्रिय घराणे देवराजजी महा- राणा या नांवाच्या एका परराक्रमी रजपूत पुरुषानें दक्षिणेत स्थापन केले. यासंबंधी अशी पूर्वपीठिका आहे की, अयोध्या प्रांतांत " शिसोदें " ह्या नांवाचे सूर्य- वंशीय राजे राज्य करीत असतो त्यांच्यांतील एका पराक्रमी पुरुषानें नर्मदा नदीच्या दक्षिणतीरीं येऊन त्या ठिकाणी एक राज्य संपादन केलें; व तेथें तो स्वतंत्रपणें राज्य करूं लागला. पुढे शककर्ता शालिवाहन यानें त्याच्या