पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

वंशांतील एका राज्यकर्त्यांचा पराभव करून त्यास पदभ्रष्ट केले; तेव्हां त्याची स्त्री आपला पांचसहा वर्षांचा मुलगा बरोबर घेऊन तेथून मेवाड प्रांतांत गेली; व तेथे आपल्या ह्या अज्ञान मुलासह एका ब्राह्मणाच्या आश्रयास राहिली. ह्या ठिकाण असतां हा मुलगा दररोज त्या ब्राह्मणाच्या गाई रानांत चारण्याकरितां घेऊन जात असे. त्याप्रमाणें एक दिवस तो मुलगा रानांत गेला असतो त्यास एके जागों पुरलेलें पुष्कळ द्रव्य सांपडले; तें घेऊन तो घरी परत आला, व तें त्या ब्राह्मणास दाखवून, त्याने घडलेली सर्व हकीकत त्यास सांगितली. नंतर त्या ब्राह्मणाच्या मदतीने त्यानें तो पहाडी प्रदेश आपल्या इस्तगत करून घेतला; त्या ठिकाणी आपले राज्य स्थापन केलें, व तेथे एक किल्ला बांधून त्यास "चित्रकूट" हे नांव दिले; हाच किल्ला सांप्रत "चितोड*" ऊर्फ “चितोडगड" ह्या नांवानें प्रसिद्ध असून त्या ठिकाणी त्याच्या वंशजांनी पुढे पांचशे वर्षे राज्य केलें, असें म्हणतात.

 मध्यंतरी, इ. स. १२७५ च्या सुमारास महाराणा लक्ष्मणसिंह ह्या नांवाचा एक पुरुष या चितोड येथील गादीवर बसला; त्यास भीमसिंह या नांवाचा एक चुलता असून तोच राज्याचा सर्व कारभार पहात असे; त्यास पद्मिनी या नांवाची एक अतीशय लावण्यसंपन्न स्त्री होतीः तिच्या लोकोत्तर


 *चितोड ऊर्फ चितोडगड हा इतिहासप्रसिद्ध किल्ला उदेपूरच्या राज्यांत उदे- पूरपासून अजमायें सत्तर मैलांवर, राजपुताना-माळचा रेल्वेच्या खांडवा ते अज मीर मार्गावर असून ते एक रेल्वेस्टेशनही आहे; व येथून उदेपूरपर्यंत एक रेल्वेचा फांटा गेलेला आहे. चितोड हा गांव गामेरी नदीच्या कांठीं वसलेला असून गांवापासून किल्ला अगर्दी जवळ आहे; व गांव आणि किल्ला यांच्या अजमा मधोमध स्टेशन आहे; हा किल्ला आगगाडीतून जातां येतांनाही दृष्टीस पडतो; व त्याचें भव्य असे दर्शनीय स्वरूप पाहूनच मन थक्क होऊन जातें.