पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९२ )

नंतर त्याने पहिल्याने विजापूरकरांची मदत मिळावली. यावेळी खवासखान या नावाचा एक सरदार अदिलशाही राज्याचा वजीर होता; त्याच्याकडे शहाजीनें मुरारपंतामार्फत बोलणें सुरूं केलें; व त्यास असे कळविलें कीं,


जलें; तेव्हां तो लागलीच सिंहगड येथे परत आला, व याच ठिकाणी त्यानें आपल्या पित्याचें और्ध्वदोहक कर्म यथासांग करून पुष्कळ दानधर्म केला.

 छत्रपति राजाराम महाराज ( शिवाजीचा धाकटा मुलगा व छत्रपति संभाजीचा धाकटा भाऊ) जालना शहर लुटीत असतां त्याच्यावर एकदम मोंगल सैन्य चाल करून आलें; त्यामुळे घाईघाईनें परत येत असतां राजा- रामास प्रवासांत अतीशय त्रास होऊन नवज्वर झाला व तो सिंहगड येथे आला; तोच इ. सन १७० • फेब्रुवारीत छातीत विकार होऊन त्यास रक्ताच्या उलट्या होऊं लागल्या; ताप येऊं लागला व लवकरच ( इ. सन १७०० मार्च ) हा मराठ्यांचा तिसरा छत्रपति एकाएकीं याच सिंहगडावर मृत्यू पावला.

 शिवाजीचा नित्यपुजेचा बाण राजाराम जवळ ठेवून पूजित असे. त्याची स्थापना सिंहगडी करून, व राजारामाची तेथेंच छत्री बांधून, रामचंद्र निल- कंठ अमात्य हुकमत पन्छा ( हुकूम चालविणारा ) यानें त्याच्या व छत्रीच्या पूजानैवेद्याचा व पुण्यतिथीचा खर्च चालण्यास गांव व सरंजाम नेमून दिला. त्याप्रमाणे वहिवाट चालत आहे.

 शिवाजीचा प्रसिद्ध स्नेही तानाजी मालुसरे व मोंगल सरदार शूर रजपूत राठोड सरदार उदेभान हे उभयतां याच ठिकाणी लहून मृत्यू पावले ( इ० सन १७७०. फेब्रुवारी ). त्यांची थडगी एकमेकांपासून सुमारे दीडशें याडांच्या अंतरावर किल्लयाच्या वायव्य कॉपन्यांत आहेत; त्यापैकीं उदे- भानाचे थडगे हैं पिराचें स्थान मानितात.

 ह्या किल्लयांत एक हजार मनुष्य राहण्यासारखी जागा असून आंत पाण्याची लहान मोठी दहा बारा टार्की आहेत; व त्यांचे पाणी स्वच्छ व थंडगार असून फार गोड आहे. किल्लयांत एक धर्मशाळा असून तेथें पाहिजे त्यास रहावयास जागा मिळते. हा किल्ला अद्यापि फार चांगल्या स्थितींत आहे.