पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९३ )

 "निजामशाहीचे एकंदर ८४ किल्ले आहेत; त्यापैकी एक दौलताबादचा किला मोंगलांच्या हस्तगत झाला, तरी तेवढ्यामुळे निराश होण्याचें बिन- कूल कारण नाहीं; आणि अदिलशादी दरबारानें मला मनापासून मदत केल्यास, मी निजामशाहीची पुन्हां स्थापना केल्याशिवाय राहणार नाहीं. " निजामशाहीच्या नरडीस मोंगलांनी नख दिले, ही गोष्ट विजापूरकरास बरी वाटली नाहीं. आपणावर व आपल्या राज्यावर, पुढे केव्हां तरी असाच प्रसंग येणार, अशा वाजवी भितीनें, व निजामशाहीतील कांहीं प्रदेश आपणास मिळेल, या आशेनें अदिलशहा शहाजीस मदत करण्यास तयार झाला. मोगलांनी निजामशाहीचा सगळाच मोठा घांस आपल्या घशाखाली उतरविला, तो विभागून त्याचा थोडासाही भाग त्यांनी अदिलशहास दिला नाही, ही गोष्ट, अदिलशाही मदत मिळण्यास, शहाजीच्या अतीशय फाय- द्याची झाली; आणि खवासखान, सेनापती रणदुल्ला खान, मुरार जगदेव- कदमराव वगैरे अदिलशाही राज्यांतील प्रमुख मंडळी, व अदिलशहा, हे सर्व शहाजीच्या पक्षास मिळाले. त्यांनी शहाजीस मदत करण्याचे अभिवचन दिलें; व त्यानंतर लागलीच शहाजीनें पुढील उद्योगास मोठ्या धडा- डीने सुरुवात केली.

 शहाजीच्या या उद्योगाची बातमी मोंगल सरदार मोहोबतखान यांस समजल्यावर त्याने शहाजीस या कार्यापासून परावृत्त करण्यास आपली शिकस्त केली. शहाजीनें मोंगलांची नोकरी सोडली तरी त्याचे चुलत भाऊ मालोजी, परसोजी व खेळोजी, हे मोगली सैन्यांतच नौकरांस होते. त्यापैकी परसोजी व मालोजी यांच्यामार्फत, मोहबतखान यानें, स्वतः नामानिराळे राहून, दौलताबादचा किल्लेदार इरादतखान यांजकडून शहाजीकडे असा प्रेष पाठ- विला की, " बावीस हजार स्वारांची मनसबी तुम्हास दिल्याबद्दलचें फर- मान आम्ही बादशहाकडून आणवून ठेविलेलें आहे; तरी तुम्ही आरंभिलेला उद्योग सोडून देऊन पुन्हां बादशाही नौकरींत येऊन दाखल व्हा; शिवाय तुमचे मुलगे संभाजी व शिवाजी यांनाही स्वतंत्र मोठ्या मनसबा देववूं, आणि तुमच्या इतरही कांहीं मागण्या असल्यास त्याही बादशहाकडून मान्य करवून देऊं." परंतु शहाजीनें मोंगलांचें हे म्हणणे मोठ्या विकाराने अमान्य