पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९१)

सुरक्षितपणें पोंचवून दिलें; व अशा रीतीने जिजाबाई व शिवाजी हाँ उभ- यतां या संकटांतून मुक्त झाली.

 शहाजीनें निजामशाहीचा उद्धार करण्याचा पुन्हां उद्योग आरंभिल्या-


क्यांत, पुण्याचे नैर्ऋत्येस पंधरा मैलांवर सिंहगड-भुलेश्वर ( हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे ) डोंगराच्या रांगेतील एका उंच टेकडीवर बांधलेला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४३२२ फूट व खालील सपाट प्रदेशापासून २३०० फूट उंचीवर आहे. या किल्ल्याची उत्तर-दक्षिण बाजूची चढण फारच बिकट असून ह्याच बाजूस तो फार उंचहि आहे. पुणे येथून सिंहगड येथे जातांना मार्गात विठ्ठलवाडी, खडकवासलें, डोणजे, व किल्लयाच्या पायथ्याशीं अतकरवाडी वगैरे खेडर्डी लागतात; किल्ल्याचा सुमारे दीड मैल चढाव चढून गेलें म्हणजे मेट या नांवाची एक विसावा घेण्याची जागा लागते. तेथून सुमारें एक मैल चढाव चढून वर गेले म्हणजे किल्लयाच्या बाहेरच्या बाजूस एक गुहेसारखा भाग दृष्टीस पडतो, व त्यांत खोल पाणी आहे. किल्लयावर जाण्याला कांहीं बिकट पायवाटा असून दोन साधारण सोपे मार्ग आहेत. किल्लयांत जाण्याला या दोन साधारण सोप्या मार्गात दोन दरवाजे लागतात. त्यांपैकी ईशान्येकडील दरवाजास पुणे दरवाजा, व अमेथीकडील दरवाजास कल्याण अथवा कोंकणी दरवाजा असे म्हणतात. यांपैकी कोंकणी दरवाजा- कडील रस्ता पुणे दरवाजाच्या रस्त्याहून सोपा आहे; व त्याच्या रक्षणाकरितां एकाच्या मान्यत दुसरा असे आणखी तीन दरवाजे बांधलेले असून प्रत्येक दरवाजाला भक्कम बुरूज बांधलेले आहेत. किल्ल्यांत शिरल्याबरोबर तोंडांशी खडकांत खोदलेली सुमारें शंभर घोडे बांधतां येतील एवढी एक मोठी घोड्याची पागा आहे. हा किल्ला साधारणतः त्रिकोणाकृति असून त्याची तट- बंदी फार मजबूत आहे. किल्ल्याचें क्षेत्रफळ सुमारें दोन मैल, पूर्वपश्चिम लांबी १००० फूट व उत्तर-दक्षिण रुंदी २५०० फूट असून त्याची उत्तरेकडील बाजू, त्या अंगास अतीशय खोल कडा तुटलेला असल्यामुळे, स्वतः सिद्धच फार मजबूत आहे. इ० सन १६६४ मध्ये शिवाजी सुरत शहर लुटून परत फिरतो न फिरतो तोच त्यास शहाजीच्या मृत्यूचें दुःखद वर्तमान सम-