पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)


महालदारखान हा होय; निजामशाही राज्यावर मोंगलांनी चढाई केल्या- बरोबर महालदारखान हा अतीशय घाबरला व तो मोहबतखानास शरण गेला; आणि " मला बादशाही नौकरींत दाखल करा; म्हणून स्यानें मोहबत खानास विनंती केली. त्या वेळी खानाने त्यास सांगितले कीं, शहाजीचें कुटुंब जिजाबाई व मुलगा शिवाजी ह्रीं उभयतां हल्लीं बायझापूर येथे रहात आहेत; त्यांना तूं जर पकडून आणून आमच्या स्वाधीन करशील तर, तुझ्या इमानी- पणाबद्दल बादशहाची खात्रो होऊन तो तुला आपल्या नोकरीत दाखल करील. ही अट त्या किल्लेदारास मान्य झाली; त्यानें जिजाबाई व शिवाजी या उभय तांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले; आणि युक्तिप्रयुक्तीनें त्यांना पकडून मोहबतखानाच्या छावणीत आणिलें. यावेळीं लखूजीचा भाऊ जगदेवराव जाधव-जो मोंगलांतर्फे शहाजीबरोबर युद्ध करीत होता तो शहाजीचा चुलत सासरा जगदेवराव जाधव-हाही तेथेंच होता. त्यास ही हकीकत कळल्या- बरोबर तो खानास जाऊन भेटला. "शहाजीचें व आमच्या घराण्याचे वांकडे आहे; त्यामुळे त्यानें जिजाबाईस व तिच्या मुलास टाकून दिलेले आहे; शहा- जीचें व जिजाबाईचें पटत नाही म्हणून त्यानें मोहित्यांची कन्या तुकाबाई हिजबरोबर दुसरा विवाह केला आहे. म्हणून जिजाबाईस व तिच्या मुलास पकडल्यानें शहाजीस वाईट वाटण्याच्या ऐवजी उलट आनंदच होईल; परंतु त्यामुळे आमचा अतीशय कमीपणा होऊन आमच्या घराण्याची मात्र अब्रू जाईल; " अर्से खानास सांगून, त्या उभयतांना सोडून देण्याबद्दल त्याच्या जवळ रदबदली केली, खानासही जगदेवरावाचें हे म्हणणें खरें वाटलें, व त्यानें त्या उभयतांना जगदेवरावाच्या स्वाधीन केलें ( इ. सन १६३४ ). तेव्हां त्याने त्यांना शहाजीच्या ताब्यांतील कोंडणाX किल्लघावर लागलीच


अजमार्से वीस मैलांवर असून, तेथून त्रिकपर्यंत पक्कथा सडकेचा रस्ता आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी “श्री त्रिंबकेश्वर" हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग ह्या ठिकाण आहे, व येथून जवळच असलेल्या ब्रह्मगिरीच्या डोंगरावर गोदावरी नदीचा उगम असून त्यास " गंगाद्वार " अथवा " गोदाद्वार " असे नांव आहे.

 X कोंडणा, कोंडाणे अथवा सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यांत हवेली तालु..