पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८९ )

अतीशय मंडावून सोडिलें; दौलताबादच्या किल्लयास मोंगलांचा वेढा पडला असतां त्या सैन्यावर सारखे छापे घालून शहाजीने त्यांस अतीशय हैराण केले; त्यामुळे मोगल सरदार मोहबतखान चिडीस गेला, आणि शहाजीचा सूड उग विण्याकरितां त्यानें एका निराळ्याच मार्गाचें अवलंबन केले. शहाजीची पहिली बायको जिजाबाई व मुलगा शिवाजी ह्रीं उभयतां यावेळी बायझापूर-हैं शहर औरंगाबाद शहराच्या पश्चिमेस अजमार्से पंचवीस मैलांवर आहे- येथे होती; त्यांना पकडून आपल्या ओलीस ठेवून शहाजीस वठणीवर आणावा, व त्याच्या मोंगली सैन्याविरुद्धच्या सर्व चळवळी बंद पाडाव्या, असा त्यानें बेत केला. मोहबतखान हा पहिल्यापासूनच शहाजीस पूर्णपणे ओळखून होता; त्यास तो आपला " एक कट्टा व जबरदस्त प्रतिस्पर्धी" म्हणून समजून होता. शहाजीचे सर्व उद्योग, व त्याची सर्व कारस्थाने हाणून पाडण्याचा तो सारखा प्रयत्न करीत होता; पूर्वी फत्तेखान हा निजामशाही राज्याचा सूत्रचालक असतां शहाजी बलाढ्य होऊं नये म्हणून त्याने पुष्कळ खटपट केली होती. त्या वेळी फत्ते- खानाच्या अमलास कंटाळून गालना येथील किल्लेदार तेथील किल्ला, शहाजीस- त्याच्या जवळून कांहीं सांपत्तिक मोबदला घेऊन देण्यास तयार झाला असतां मोहबतखानाने मोठी खटपट करून, त्या किल्लेदारास मोठी लालच दाखवून, आपल्या पक्षांत ओढून घेऊन, तो किल्ला आपल्या स्वाधीन करून घेतला होता आणि या वेळी, जिजाबाई व शिवाजी या उभयतांना पकडून आपल्या हवाली करण्याची कामगिरी बजावील, अशा मनुष्याच्या तो तपासांत होता. इतक्यांतच त्याच्या सुदैवाने त्याला ती कामगिरी बजाविणाऱ्या योग्य मनुष्याचा लाभ झाला. हा मनुष्य म्हणजे त्रिंबक* येथील किल्लेदार


विशेष सन्मानाने वागविलें, व प्रसिद्ध चंदी येथील ठाण्यावर मुख्य अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.

 या शिवाय कोयाजी या नावाचा एक रक्षापुत्र शहाजीस होता व त्याच्या- वर व्यंकोजांची फार कृपादृष्टी होती ( रा. म. वि. चंपू पहा). असा उल्लेख आढळतो.
 ●त्रिंबक हे गांव व प्रसिद्ध क्षेत्रस्थान नाशिक जिल्ह्यांत, नाशिकपासून