Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ८० )

अल्लाउद्दीनची त्याच्यावर विशेष मर्जी बसली, आणि अकल्पनातीतरित्या तो पुढे अतिशय वैभवास चढला. इ. सन १३०३ मध्ये बादशहानें त्याजकडे वारंगूळचे राज्य हस्तगत करण्याची कामगिरी सोपविली होती, व त्यानंतर इ. सन १३०६ मध्ये, त्यास दक्षिण प्रांत सर करण्यास पाठवून राजा कर्ण याची मुलगी देवलदेवी हिचाही तपास करण्यास बजाविले होते.
 देवल देवीची आई व राजा कर्ण याची बायको कमलादेवी, ही बादशा- हाच्या जनानखान्यांत राहिल्यानंतर तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते, आणि विशेष आश्चर्याची ही गोष्ट आहे की, अलाउद्दीन याने तिच्याच आग्रहा-- वरून देवल देवीचा शोध लावून तिला दिल्लीस पाठविण्याविषयीं गुजराथचा सुभेदार अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ आलपूलान यास, व मलीककार यांस, मुद्दामहुकूम दिले होते; मालिककाफुर हा दक्षिणत आल्यावर त्याच्या मदतीस आलफूखान हा गुजराथेंतून निघाला व आपला मार्ग कमोव देवगडपासून एक मजलेवर वेरूळच्या लेण्याजवळ तो येऊन पोहोचला त्या ठिकाणी त्याचा मुक्काम असतां देवलदेवी ही अकस्मात त्याच्या हातांत सांपडली; तेव्हां बादश हाच्या हुकुमाप्रमाणे तो तिला घेऊन दिल्ली येथे गेला; तेथे गेल्यावर अल्लाउद्दीन यानें आपला वडील मुलगा शहाजादा खिजरखान याच्याशी तिचे लग्न लावून दिलें; परंतु पुढे अल्लाउद्दीन मृत्यू पावल्यानंतर ( इ. सन १३१६ ) त्याचा दुसरा मुलगा मुबारिक याने खिजरखानाचे डोळे काढून देवदेवीत आपल्या जनानखान्यांत घेतलें; मुबारिक हा अत्यंत क्रूर व दुर्व्यसनी असून तो फक्त चारच वर्षे गादीवर राहिला. मलिक खुशरू या नांवाचा एक जाती भ्रष्ट गुजराथी त्याच्या विशेष विश्वासांतील असून तो यावेळी मुख्य वजीर होता; त्यानें मुबारिक याची व खिलजी राजघराण्यांतील इतर सर्व मंडळींची कत्तल करून आपण राज्य बळकाविलें त्यावेळीं दुर्देवो देवलदेवीस त्याने आपल्या जनानखान्यांत ओढिल; परंतु मलिकखश्रू हा अतीशय क्रूरकर्मी असल्यामुळे त्याचा अंमल सर्व प्रजेस अतिय दुःसह झाला; ही संधी साधून पंजाबचा मुभे- दार गाझीत्रेग यानें दिल्लीवर चाल करून येऊन से शहर हस्तगत केले; खुस ठार मारिलें, आणि ग्यानुद्दीन हें नांव धारण करून तो दिल्लीच्या तख्तावर आरूढ झाला. ( इ० सन १३२० ) हाच तुच्लग, अथवा तुलक घराण्यांतील पहिला