Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७९ )

केला; आणि कसेही करून कर्णाचा नाश करावा या विचारानें तो दिल्ली येथे जाऊन अल्लाउद्दीन यास भेटला; व त्यास घडलेली सर्व हकीकत निवेदन - करून गुजराथेवर स्वारी करण्यास त्याचे मन प्रवृत्त केले; अल्लाउद्दीन हा मोठा महत्त्वाकांक्षी असून हिंदुस्थानांत आपला दिग्विजय वाढवीत नेण्याची त्यास विशेष उत्सुकता होती; त्यामुळे घर बसल्या अशी चालून आलेली संधी तो व्यर्थ दवडील ही गोष्ट शक्य नव्हती; म्हणून त्यानें ताबडतोब आपले सरदार आलखान व नुसरतखान यांच्याबरोबर सैन्य देऊन त्यांची गुजराथ प्रांतावर - रवानगी केली. राजा कर्णे हा नुसता दुर्व्यसनीच नव्हता; तर तो अतीशय भित्रा व नेभळा पुरूष होता; अलाउद्दीनचे सैन्य अनहिलपट्टणवर चाल करून येत आहे, असे त्यास कळतांच तो भीतीनें आपला जीव घेऊन पळाला; व मुसलमा नानीं त्याची राजानो, इतकेंच नव्हें तर त्याचें सर्व राज्य व बायकोसुद्धां हस्तगत करून घेतली. राजा कर्णे यांस कमलादेवी या नांवाची एक रूपवती स्त्री असून तिच्या पोटीं झालेली देवलदेवी या नांवाची एक कन्या होती. राजा कर्ण हा या मुलीसह बागलाणाकडे पळून गेला; परंतु कमलादेवी मुसलमानांच्या हातांत -सांपडली. तेव्हां त्यांनी तिला अल्लाउद्दीन बादशहाकडे दिल्लीस पाठविली, व तिच्या सुंदर स्वरूपावर लुब्ध होऊन अल्लाउद्दीन याने तिच्याशी लग्न लावून तिला आपल्या जनानखान्यांत ठेविल. त्यानंतर आलफखान व नुसरतखान या उभयतां सरदारांनी खंबायत व सोरटी सोमनाथ येथे लूट केली; पुढे इ० सन १३०४ मध्ये अल्लाउद्दीन यार्ने आलफ् खानास गुजराथचा सुभेदार नेमिले; व अशा रीतीनें गुजराथ प्रांत मुसलमानी अमलाखाली गेला.
 याचवेळी मलिक काफूर या नांवाचा एक हीन स्थितींतील मनुष्य उद- यात आला. हा मनुष्य संवायत येथे एका सावकाराजवळ गुलाम होता. यावेळी संवायत है शहर विशेष भरभराटीत असून तेथील व्यापार फार जोरांत होता, व त्यामुळे तें शहर श्रीमान बनलेलें होतें; व अलाउद्दीनच्या उभयतां सरदारसि त्या शहराची लूट करण्यासही, तेथील श्रीमंती हॅच कारण झालेल होतें; व तेथील लुटींत या सरदारानी मलिक काफूर यासहस्तगत करून घेऊन व त्याची दिल्लोस अलाउद्दीन बादशहाकडे रवानगी केली होती. मलिक काफूर हा खरोखरी व कर्तृत्ववान होता, आणि या वेळी त्यास त्याच्या नशिबानंही भरभक्कम हातभार लावला होता; त्यामुळे तो दिल्ली येथे गेल्यानंतर लवकरच