Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८१ )

त्याने या हतभागी देवलदेवीचा उत्तम चंदोबस्त करून दिला, आणि तिच्या आयुष्यांतील धिंडवडे वांचवून या दुःखदायक व हीन स्थितींतून तिची बन्याच प्रमाणांत सुटका करण्याचें श्रेय घेतलें.
 गुजराथचा माजी राजा व देवलदेवीचा पिता कर्ण हाही इकडे अतिशय दु.खांत, हालअपेष्टेंत आणि अज्ञात स्थितीत लवकरच मृत्यू पावला आणि अशा रीतीनें गुजराथ प्रांत हिंदू राजांच्या अंमलाखालून निघून मुसलमानांच्या ताब्यांत गेला.
 या काळांत गुजराथशिवाय रजपूत व इतर हिंदू घराण्याची बरीच राज्य उत्तर हिंदुस्थानांत अस्तित्वांत होती; तथापि त्यांच्यामध्ये आपसांत एकोपा अथवा जूट नसून उलट कित्येकांत तर परस्पर वैमनस्यें बसत होती. त्यामुळे मुसलमान लोकांनी जेव्हां हिंदुस्थानावर दिग्विजय मिळविण्याकरितां एकसारखे हल्ले सुरू केले, तेव्हां त्या राज्यकर्त्यांना एकजुटीने त्यांचा प्रतिकार करिती आला नाहीं; आणि उलट त्यापैकी कित्येकांनी मुसलमान लोकांसच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करण्यांत भाग घेतला असल्याने तशा प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक राज्यकर्त्यांना त्यांत यश आलें नाहीं, व तसा प्रतिकार करू इच्छिणाऱ्यांनां प्रमुखत्वाने पुढे येता आले नाहीं. याचा परिणाम असा झाला की मुसलमान लोकांनी त्यांना जिंकून आपल्या श्रेष्ठ सत्तेच्या आधीन करून घेतलें, आणि हिंदुस्थानांत त्यांचा अंमल चालू झाला.


 हिंदुस्थानच्या उत्तर दिशेकडील संवटित राजसत्ता विस्कळित झाल्यावर गुजराथ, सिंध, व पंजाब, हे प्रांत मुसलमानाच्या अमलाखाली गेले, व बंगाल आणि नर्मदा नदीच्या उत्तरेकडील कांहीं भाग, एवढाच प्रदेश कायतो एतद्दे- शीय राज्यकर्त्यांच्या खास अंमलाखाली राहिला. प्रसिद्ध राज्यकर्ता शिलादित्य उर्फ हर्षवर्धन याच्या मृत्यूनंतर चोहोंकडे बेबंदशाही माजली; तिचा फायदा घेऊन गुप्त घराण्यांतील एका पुरुषाने आपले राज्य स्थापन के है; या घराण्यांत जयगुप्त, हरिगुप्त व जीवितगुप्त वगैरे प्रसिद्ध राजे होऊन गेले; त्यांत जीवितगुप्त हा चक्रवर्ती राजा इ० सन ७४० च्या सुमारास राज्य करीत होता, असा दाखला आढळतो. पुढें या राज्यास उतरती कळा लागली, व इ०सन ८४० च्या सुमारास तर फक्त बंगाल व बिहार या दोन प्रतिविरन कायतो या गुप्त