Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७८ )

 लवणदेव गादीवर असतांना, देवगिरी उर्फ दौलताबाद येथील यादव ( उर्फ जाधव) राजा सिंघण यानें, त्याच्या राज्यावर स्वारी केली; परंतु लवण- - प्रसाद व बीरधवल या उभयतांनी मिळून तिचा प्रतिकार केला; त्यामुळे सिंघण यास परत जाणे भाग पडले; लवणप्रसाद यानें इ० सन १२३२ च्या सुमारास • राज्यपद सोडून त्यावर आपला मुलगा वीरधवल याची स्थापना केली;
 या वीरधवलाची कारकीर्द फार लहान म्हणजे फक्त पांच वर्षाचीच असून तो इ० सन १२३८ मध्ये मृत्यू पावला. त्यानें कच्छ देशाचा राजा भद्रेश्वर याचा पराभव केला. इतकेंच नव्हें तर महमद घोरीबरोबरील युद्धांत त्यानें बादशाही सैन्याचाही पूर्णपर्णे पराभव करून त्यास माघार घेणे भाग पाडिलें; वीरधवल हा इतका लोकप्रिय होता कीं तो मृत्यू पावल्यावर त्याच्याजवळील १८० सेवकांनी त्याच्या वितेत आपणास स्वखुषीनें जाळून घेतलें, इतकेंच नाहीं तर आणखी कित्येक लोक त्या मार्गाचें अवलंबन करण्यास तयार होते; परंतु प्रधान तेजपाळ यानें त्यांना मनाई करून त्या कृत्यापासून परावृत्त केलें.
 वीरधवल याच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा विसलदेव व त्यानंदर अर्जुनदेव, लवणदेव, सारंगदेव व कर्णदेव हे अनुक्रमें गादीवर आले; कर्णदेव यास कर्ण वाघेला अथवा घेलो ( म्हणजे भोळा अथवा मूर्ख ) अशी संज्ञा आहे. हा राजा मोठा विषयी व दुर्बर्तनी असून त्यामुळे त्याने स्वतःवर व गुजराथ देशावर आपत्ती ओहून आणिली. राजा कर्ण याचा माधव या नांवाचा एक नागर प्रधान असून त्याची पत्नी विशेष रूपवती होती. कर्ण हा नीतिभ्रष्ट व विवेकशून्य असल्यामुळे या स्त्रीविषयीं त्याच्या मनांत पापवासना उत्पन्न झाली; आणि ती पूर्ण करण्याच्या दुष्ट हेतूनें, माधव हा घरीं नाहीं, अशी संधी साधून त्यानें तीस, बलात्कार करून राजवाडयांत नेलें; यावेळीं माधव जरी हजर नव्हता, तरी त्याचा भाऊ केशव हा त्या ठिकाणी हजर असून त्यानें आपल्या भ्रातृजाये कर्ण राजाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास अपयश येऊन तो स्वतःच प्राणास मुकला. माधव परत आल्यावर त्यास ही हकीकत समजली; परंतु राजा कर्ण याच्यापासून आपली बायको सोडवून आण- ण्यास, अथवा त्याच्या ह्या दुष्ट कृत्याचा सूड उगविण्यास, तो असमर्थ अस- याने त्याने निराळ्याच मार्गाने या गोष्टीचा वचपा काढून घेण्याचा निश्चय