Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७७ )

जोर होऊन शहाबुद्दीन घोरी प्रबळ झाला; त्यानें दिल्ली व कनोज येथील राज्यांचा पाडाव केला, आणि त्याचा प्रसिद्ध सरदार कुत्यूउद्दीन यानें आपल्या मोठ्या सैन्यासह गुजराथ प्रांतावर स्वारी करून अनहिलपट्टणला शह दिला, व भीमदे वाचा पूर्ण पराजय करून त्यास आपला जीव बचावण्याकरितां पळून जाणें भाग पाडले; भीमदेव हा इ. सन १२९५ मध्ये मृत्यू पावला, व त्याच्या बरोबरच गुजराथेतील सोळंखी वंशाचा शेवट होऊन वाघेल वंश उदयास आला.
 या बाघेल उर्फ वाघेला वंशाचा सोळंखी वंशाशी अगदीं निकटचा असा पूर्वसंबंध होता. व तो कुमारपालापासून ( कारकीर्द इ० सन ११४३ ते ११७४ पर्यंत ) जडलेला होता. तो असा कीं, या कुमारपाळास अनाकराज उर्फ अरुणराज या नांवाचा एक मावसभाऊ असून त्यास कुमारपालाने आपल्या कारकीर्दीत व्याघ्रपल्ली उर्फ वाघेल वगैरे गांवें जहागिरीदाखल देऊन आपल्या दरबारी ठेविलें होतें; त्यास लवणप्रसाद या नांवाचा एक मुलगा होता; तो मोठा पराक्रमी असून या वाघेला घराण्यांतील पहिला राजा होता. भोळ्या भीमदेवाच्या कारकीर्दीत तो स्वतःच्या कतृत्वाने प्रधानपदा पर्यंत योग्यतेस चढलेला होता, लवणप्रसाद याने स्वपराक्रमानें धोलका प्रांत मिळविला; त्यामुळे वाघेल व घोलका, या दोन्हीं परगण्यांचे व्यापक क्षेत्र त्याच्या अधिकारकक्षेखालीं आलें. त्यास वीरधवल या नांवाचा एक मुलगा असून तो गुजराथच्या इतिहासांत पराक्रमी, दयाळू, नीतिमान व कर्तबगार म्हणून विशेष प्रसिद्ध आहे; वस्तुपाल व तेजपाल हे दोन कतृत्ववान जैनधर्मी बंधू त्याच्या दरबारी प्रधान व सेनापती म्हणून होते, व त्यांच्या साह्यानें तो मोठ्या कुशलतेने राज्यकारभार चालवीत होता; तथापि लवणप्रसाद व वीर- धवल या उभयतांनीही, जरी तेच वस्तुतः राज्य चालवीत होते तरी, राजा है। पद धारण केलें नव्हतें प्रसिद्ध " कीर्तिकौमुदी " व " वस्तुपालचरित्र " या ग्रंथाचा कर्ता पंडित सोमेश्वर हा लवणप्रसादाचा गुरू असून तो व त्याचा मुलगा वीरववल यांनीं अबू, गिरनार व शत्रुंजय टेकडीवर प्रसिद्ध जैन मंदिरें बांधिल आहेत, आणि त्यांतल्या त्यांत अबूच्या पहाडावरील मंदिरें शुद्ध संग- मरवरी दगडाची असून त्यांतील नक्षी वगैरेचें काम अप्रतिम व आग्रा येथील प्रसिद्ध " ताजमहाल " या इमारतीच्या खालोखाल आहे, अशी त्याची कीर्ती आहे;