Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७६ )

- मंदिरांचा विध्वंस केला; जैन पंडित रामचंद्र यास तांत्र्याच्या तापविलेल्या पत्र्या- बर बसवून त्याचा प्राणनाश केला, इतकेंच नव्हे तर आपला ब्राम्हण प्रधान कपर्दी यासही त्यानें तापलेल्या तेलाच्या कढईत टाकून ठार मारिलें; अशा अनेक क्रूर कृत्यांमुळे त्याच्याविषयीं अतीशय अप्रीति व द्वेष उत्पन्न झाला, आणि शेवटीं त्याच्याच एका पहारेकऱ्याने त्यास ठार मारिलें. ( इ० सन ११७९ ) कुमारपाळाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मूळराज हा गादीवर आला, आणि तो अज्ञान असल्याने त्याची आई नैकीदेवी ही आपला भाऊ भीमदेव - याच्या मदतीने राज्यकारभार लागली. परंतु दोन वर्षांतच इ. सन १९८१ - मध्ये दुसरा मूळराज मृत्यू पावला, व भीमदेव हा गादीवर आला.
 भीमदेव हा मोठा शूर असून दिल्लीपती प्रसिद्ध पृथ्वीराज चव्हाण याचा - तो समकालीन होता; त्यास भोळा भीमदेव असेही म्हणत अवत; या भीम- 'देवाच्या पदरीं अमरसिंह या नांवाचा एक प्रसिद्ध व विद्वान जैनधर्मी पंडित असून त्यानेंच " अमरकोश " या नांवाचा प्रसिद्ध ग्रंथ केला आहे. या भीम- देवाचे व पृथ्वीराजाचे स्त्री विषयक बाबतीवरून हाड वैर माजले, आणि त्याचा परिणाम अतिशय अनिष्ट होऊन आपसांतील या फाटाफुटीचा परदेशीय मुसल- मानानां अत्यंत मौल्यवान फायदा मिळाला व त्यांना हिंदुस्थानच्या उन्नत भूमींत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करिता आले. या काळात अबूगड - येथें "जैत परमार या नांवाचा एक राजा राज्य करीत असून त्यास इच्छिनी कुमारी या नावाची एक अतीशय लावण्यवती कन्या होती; या राजकन्येशीं आपण विवाह करावा, अशी भीमदेवास इच्छा उसन्न झाली व त्याप्रमाणे त्यानें तिब्याबद्दल तिच्या बापाकडे मागणी केली; भीमदेवाच्या या मागणीस जैव परमार यानें कदाचित अनुमोदनही दिलें असतें; परंतु त्याचा मुलगा सलख याचा ओढा पृथ्वीराजाकडे असून त्याच्याबरोबर आपल्या बहिणीचा विवाह - व्हावा, अशी त्याची इच्छा होती; त्यामुळे त्यानें ही सर्व हकीकत पृथ्वीराजास कळवून त्यास, आपल्या बहिणीबरोबर विवाह लावण्यास उद्युक्त केले; व पृथ्वीराजानेंही या राजकन्येबरोबर विवाह करण्याचा निश्चय करून तो भीम- 'देवाबरोबर युद्ध करण्यास तयार झाला; भीमदेवास ही हकीकत कळल्यावर तोही पृथ्वीराजाबरोबर युद्ध करण्यास पुढे आला, आणि उभयतांमध्ये मोठे युद्ध होऊन त्यांत भीमदेवाचा पूर्ण पराजय झाला; परंतु याच युद्धामुळे ते उभयतांही कम-