Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७५ )

पाडाव केला; व बुंदेलखंडातील महोत्रा येथील चंडेल राजा मदनवर्मा याजवर स्वारी करून त्याजकडून खंडणी मिळविली. सिद्धपूर ( येथे मातृ-गया करितात ) हें नांव या सिद्धराजावरून पडलेले असून तेथें त्यानें " रुद्रमहालय या नांवाचे एक मोठें मंदिर बांधिलें; त्याप्रमाणेच अनहिलपट्टण येथेही " सहस्त्र- लिंग " या नांवाचा एक मोठा विस्तृत तलाव बांधला. सिद्धराज हा विद्वा- नांचा भोक्ता असून मीनाममाला, अनेकार्थमाला, द्वयाश्रयकाव्य, व अध्यात्मोपनिषद वगैरे ग्रंथांचा कर्ता हेमाचार्य उर्फ हेमचंद्र या नांवाचा एक प्रसिद्ध व विद्वान जैन साधू त्याच्या आश्रयास होता.
 सिद्धराजा हा इ. सन १९४३ मध्ये मृत्यू पावला; त्यास पुत्रसंतान नव्हते; त्यामुळे त्याचा दूरचा नातलग व क्षेमराजाचा नातू ( मीमदेवाचा पणतू व त्रिभुवनपाळाचा मुलगा ) कुमारपाल, हा प्रधान कान्हादेव याच्या मदतीने गादीवर आला. सिद्धराज जिवंत असतो, आपल्यामागें कुमारपाल गादीवर यावा ही गोष्ट त्यास पसंत नव्हती; त्यामुळे आपल्या हयातीतच त्यानें कुमारपाळास ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले होते, तथापि ते सर्व निष्फळ होऊन सिद्धराजाच्या मृत्यूनंतर तो गादीवर आला. कुमारपाल हाही सिद्धराजा- प्रमाणेच पराक्रमी असून त्याने अनेक विद्वानांस आपल्या पदरीं आश्रय दिला होता; त्याचा मुख्य गुरू हेमचंद्र हा असून रामचंद्र व उदयचंद्र हे विद्वान पंडित- ही त्याच्या संग्रही होते; हेमचंद्र पंडिताच्या सहवासाने जैन मताचा त्याच्यावर पुढे पुढे तर इतका पगडा बसला कीं, त्याने स्वतः मद्यमांससेवन व शिकार करणं सोडून दिलें,आणि आपल्या राज्यांत हिंसा बंद करून शिकारीचे पर- वा काढून घेतले. कुमारपाळ हा गादीवर आल्यावर त्याने सांबराचा राजा अर्णराज, माळव्याचा राजा बल्लाळ व कोंकणचा राजा मल्लिकार्जुन यांचा परा- भव केला, आणि उत्तरेस हूण लोकांच्या राज्यापर्यंत, दक्षिणेस विंध्यपर्वता- पर्यंत व पूर्वेस गंगानदीपासून पश्चिमेस सिंधुनदापर्यंत, आपल्या राज्याचा विस्तार केला. कुमारपाळानें अजमार्से ३१ वर्षे पुष्कळच कुशलतेने राज्यकारभार केला, परंतु इ० सन १९७४ मध्ये त्याचा पुतण्या व महिपालाचा मुलगा अज-. यपाल याने त्यास विषप्रयोग करून ठार मारिलें, व तो स्वतः राज्यारूढ झाला.
 अजयपाल हा शैवपंथी असून मोठा क्रूर व जैन धर्माचा कट्टा शत्रू होता; त्यामुळे त्यानें जैनधर्मीयांवर नानाप्रकारचे अनन्वित जुलूम केले, अनेक जैन: