Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७२ )

म्हणून महंमदाचा पंजाब प्रांतावरील ताबा नष्ट करण्याकरितां त्यानें भीम- देवाची मदत मागितली; परंतु या दोन्ही राजघराण्यांमध्यें पुष्कळ काळापासून वैरभाव चालू असल्याने भीमदेवाने त्यास मदत दिली नाहीं; तेव्हां विसल देवास राग येऊन त्याने भीमदेवावर स्वारी केळी, व त्याचा पूर्ण पराजय करून व त्याजपासून खंडणी घेऊन तो अजमीर येथे परत गेला; म्हणजे, महंमदाच्या सत्तेला यत्किंचितही दाब न बसता, आपसांत एकमेकांनी परस्परांशी युद्ध करून स्वतःलाच कांहीं प्रमाणांत त्यांनीं कुमकुवत करून घेतले, व त्यामुळे महंमदालाच उलट त्यांनीं अप्रत्यक्षरित्या कांहीं प्रमाणति बलवान केलें; तथापि एकंदरीत पाहतां भीमदेवाची कारकीर्द बरीच सुखदायक झाली असून त्यानें भनमा ४६ वर्षे राज्याचा उपभोग घेतला; व इ. सन १०७२ मध्ये उदयामती राणीच्या पोटीं झालेला मुलगा कर्ण याची गादीवर स्थापना करून त्याने वान प्रस्थ आश्रम धारण केला, व आपले शेवटचे दिवस ईश्वरसेवेत घालविण्याकरितां तो स्वस्त्रीसह मुंडकेश्वर क्षेत्रीं जाऊन राहिला; त्यानंतर राजा कर्ण यांनें बावीस वर्षे राज्य केर्ले, व राज्यावर असतानाच तो इ. सन १०९४ मध्ये मृत्यू पावला. राजा कर्ण हा मोठा प्रजावत्सल असून त्याने अनेक लोकोपयोगी कृत्यें केलीं; त्यानें “कर्णमेरू” या नांवाचे एक देवालय, व कर्णसागर या नांवाचा एक अति विस्तृत असा तलाव बांधला, व कर्णावती या नांवाचें एक शहर वसवून तेथें 'कर्णेश्वर' या नांवाचे एक महादेवाचे मंदिर बांधिलें; हेच ठिकाण म्हणजे सांप्रतचे ' अहमदाबाद' हें शहर होय; या कर्णराजानें मध्य प्रांतांतील चंद्रपूर उर्फ चांदा येथील कदंब राजा जयकेशी याची मुलगी नामें मेलनदेवी हिच्याशी विवाह केला असून या लग्नाची हकीकत फार चमत्कारिक आहे; ती अशी कीं, एकेवेळीं एक फिरस्ता चित्रकार फिरत फिरत कर्णराजाच्या दरबारी आला, आणि त्याने राजाची भेट घेऊन त्यास असे सांगितलें कीं, दक्षिणेतील कदंबराजा जयकेशी याची उपवर झालेली मुलगी मैलनदेवी, हिने आपली कीर्ति ऐकून आपणास वरण्याचा निश्चय केला आहे, व आपणास भेटीदाखल एक हत्ती पाठविला आहे; चित्रकाराने राजास असे सांगितल्यावर तो, हत्ती पाहण्याकरितां बाहेर आला; तो त्यास नुसता हत्तीच न दिसतां राज्यकन्या मैलनदेवीही त्याच्यावर बसलेली आढळून आली; परंतु कर्गाला ती मुलगी पसंत पडली नाहीं, त्यामुळे त्यानें तिच्याशी लग्न करण्याचें नाकारिलें; राजक-