Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७१ )

गत असून या विषयांवर त्यानें ग्रंथही लिहिले आहेत. भोजराजाचं " चंपू- रामायण " व" सरस्वतिकंठाभरण" हे ग्रंथ प्रसिद्ध झालेले असून विज्ञानेश्वराच्या मिताक्षरांतही भोजराजाच्या ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे; तो स्वतः शैव पंथाचा होता, तथापि जैन धर्मासही त्याने आश्रय दिला असून प्रभाचंद्र या नांवाचा एक जैनधर्मीय साधू त्याचा गुरू होता. भोजराजाचा अंमल दक्षिणेत गोदावरी नदीपर्यंत असून बुंदेलखंड व वाघेलखंड याशिवायचा इतर सर्व मध्य हिंदु- स्थानातील प्रदेश त्याच्या अमलाखाली होता; त्याच्या पदरीं धनपाल, उतात, कालीदास (हा शाकुंतल नाटकाचा कर्ता नव्हे हे लक्षांत ठेवावें ) वगैरे विद्वान मंडळी असून त्याने अनेक लोकोपयोगी कृत्ये केलीं आहेत, व मंदिरें बांधिल आहेत. अवंती येथील क्षिप्रा नदीवरील घांट, भोपाळ संस्थानांतील भोजपूरचा तलाव, व काश्मीर प्रांतांतील पापसूदन तलाव हे त्याने बांधिले असून मांडू उर्फ मंडपदुर्ग येथे एक पाठशाळाही त्याने बांधली होती. भोजराजानंतर या घराण्यांत उदयादित्य, नरवर्मदेव वगैरे एकंदर अकरा राजे झाले. चवदाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत हे घराणे माळव्यांत स्वतंत्रपणे राज्य करीत होते; पुढे हैं राज्य अल्लाउद्दीन खिलजी यार्ने जिंकून मुसलमानी राज्यात सामील करून टाकिले; व अशा रीतीनें माळव्यांतील या प्रसिद्ध पवार उर्फ परमार घराण्याचा शेवट झाला.

 अनहिलपट्टण येथील राजा भीमदेव याची कारकीर्द ऐतिहासिक- दृष्टया विशेष महत्त्वाची आहे; कारण हिंदुस्तानांतील राज्यकर्त्यांच्या आपसां- तील वैमनस्यामुळे या देशांत मुसलमानी सत्ता स्थापन होण्यांत भीमदेवाची अप्र- त्यक्षपणे मदत झाली आहे. राजा भीमदेव हा मोठा पराक्रमी व धार्मिक प्रवृ- तीचा होता; त्याने अनेक जैन मंदिरें बांधिली असून त्यांतील अबूच्या पहाडा- तील शत्रुंजय टेकडीवरील पालीठाणा, व चंद्रावती वगैरे ठिकाणची मंदिरें विशेष प्रसिद्ध आहेत. तथापि तो दूरदर्शी नव्हता; त्यामुळे त्याच्या अदूरदर्शित्वाचे परि- नाम हिंदुस्थानातील राजेरजवाडयांस भोगणें प्रात झाले. या काळांत अजमीर येथें विसलदेव या नांवाचा चव्हाण वंशांतील एक राजा राज्य करीत होता; व त्याच्या सरहद्दीस लागून पंजाबमध्ये महंमद गजनवी याने आपला अंमल बस- विला होता; ही गोष्ट विसलदेव यास केव्हांही विशेष भीतीदायक होती; व महंमदाची त्या प्रांतावरील सत्ता नाहींशी करण्याचा तो प्रयत्न करीत होता;