Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७३ )

न्येस ही हकीकत कळल्यावर तिने आपल्या आठ दासीसह प्राणत्याग करण्याचा निश्चय केला; इतक्यांत ही हकीकत कर्णाची आई उदयामती हिच्या कानावर गेली. तेव्हां तिने " या राजकन्येशीं तूं लग्न केले पाहिजे" असा आग्रह धरिला, - व आपल्या मातेच्या इच्छे व आज्ञेप्रमाणे कर्णाने तिच्याशी विवाह लाविला; तथापि कर्ण हा पुढे व्यसनाधीन होऊन एका वेश्येच्या नादी लागला; त्यामुळे माता उदयामती, राणी मेलनदेवी व प्रधानमंडळीस चिंता प्राप्त झाली; तेव्हां प्रधानमंडळींनी राजमातेच्या अनुमतीनें मेलन देवीस अशी युक्ती सुचविली कीं, .." आपण त्या वेश्येचे सोंग घेऊन तिच्या ठिकाणीं जाऊन बसावें.” ही युक्ती राणीस मान्य होऊन तिने त्याप्रमाणे वर्तन केलें, व राजा तिच्या मोहपाशांत गुरफटला गेला; तेव्हां तिर्ने त्याच्याकडून त्याची खूण म्हणून एक मुद्रिका मागून घेतली; पुढे दिवस राहून योग्य कालानंतर मैलनदेवीस मुलगा झाला, तोच प्रसिद्ध सिद्धराज हा होय;

 सिद्धराज हा तीन वर्षांचा असता एके दिवशीं सहज खेळत खेळत आपल्या पित्याच्या सिंहासनावर जाऊन बसला; ही गोष्ट राजा कर्ण यास अपशकुनाची वाटली व ती आपल्या अंतकालाचे द्योतक आहे की काय, याबद्दल त्यास चिंता प्राप्त होऊन त्याने या बाबतींत आपल्या प्रधानाचा व ज्योतिषाचा सल्ला घेतला व - त्यास युवराज केले; पुढे सिद्धराज हा अज्ञान असतांनाच इ० सन १०९४ मध्ये राजा कर्ण हा मृत्यू पावला, व सिद्धराज उर्फ सिद्धराज जयसिंग हा गादीवर आला; परंतु तो अज्ञान असल्याने राज्याचा कारभार त्याची आई मैलनदेवी ही प्रधान अथवा सेनापती जगदेव याच्या मदतीनें पहात असे. पुढे सिद्धराज वयांत आल्यावर तो स्वतः राज्य कारभार चालवू लागला; हा राजा मोठा मातृभक्त * असून विशेष धार्मिक, प्रजावत्सल, उदार, व पराक्रमी होता. व त्यास


 * राजमाता मैलनदेवी ही मोठी हुषार, धार्मिक, व दयाळू स्वभावाची स्त्री होती. ती एकदा सोमनाथाच्या यात्रेस जात असता तिला मार्गांत पुष्कळ यात्रेकरू दुःखीकष्टी असल्याचे आढळून आले; त्यावरून तिने या बाबतींत तपास केला; तेव्हां तिला असें समजून आलें कीं, यात्रेकरूंना जबर कर द्यावा लागतो, त्यामुळे ते दुःखीकष्टी असून, पुष्कळ यात्रेकरू इच्छा असूनही निव्वळ ऐपत नसल्यामुळेच सोमनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय परत जातात; ही हकीगत "ऐकून राजमातेच्या कोमल मनावर अतीशय परिणाम झाला; तिला फार वाईट