Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७० )

होता, आणि त्यास धर्मशास्त्र, वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, व व्याकरण, अव-


 भोज: - पुच्छं किं १ ( त्यास शेपूट कां आहे ?
 कालि:——खलु ताडपत्रं लिखितं. ( ताडपत्रावर लिहिले आहे म्हणून तें शेपटीं सारखं दिसतं.
 भोजः -- जीवः किं १ ( जिवंत का ? )
 कालि:- मम मोहक मंत्र लिखितं संजीवनं पुस्तकं. ( है पुस्तक माझ्या मोहक मंत्रानें लिहिलें आहे, म्हणून सजीव आहे. )
 आता भोजराजास धीर निघेनासा झाला; त्यानें कालिदासाच्या काखेतील वस्त्र भोढून घेऊन स्वतः उघडून पाहिले, तों त्यांत मासे नसून पुस्तक निघाले !
 या भोजराजाच्या कारकीर्दीत न्याय, धर्म, दया, विद्या व लक्ष्मी पूर्णपणे वास करीत राहिल्यामुळे त्याची प्रजा अतीशय सुखी, संतोषी व नीतिमान होती, असा लौकिक आहे.
 वरील गोष्टीवरून. इतिहासाची नेहमींच पुनरावृत्ती होत असते, अथवा इतिहासाचा नेहमींच पुनरावृत्ती होण्याकडे कल असतो, या झण- ण्याची आठवण होते; असेंच तंतोतंत उदाहरण पुढे पुष्कळ शतकानंतर पेश- बाईच्या काळात घडले आहे; असें कीं बाळाजी बाजीराव पेशव्याचा धाकटा भाऊ राघोबा उर्फ रघुनाथराव दादा याने पेशवाईपदाचा अभिलाष धरून, पुढे तें पद मिळविण्याच्या त्याच्या धडपडीचे पर्यवसान नारायणरावाच्या खुनांत झालें. त्यानंतर या पापाला प्रायश्चित्त काय ? असे रघुनाथरावाने पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांस विचारिलें, त्यावेळीं, त्यानेही या पापाच्या क्षालनास दुसरे कोणतेही प्रायश्चित्त नसून " देहांत प्रायश्चित्त " एवढे एकटेंच प्रायश्चित्त आहे, असें सांगितले; वरील दोन्हीं उदाहरणांत फरक इतकाच कीं, भोजराजाचा वध झाला नव्हता, पण नारायणरावाच्या वधाची क्रिया पूर्ण झाली होती; त्याप्रमाणेच मुंजराजास झालेला पश्चात्ताप पूर्ण निर्धाराचा असून तो खरोखरीच स्वखुषीनें अग्निप्रवेश करून स्वदेह नष्ट करण्यास तयार झाला होता; उलट पक्षीं राघोबास पश्चात्ताप झाला असला तरी तो निर्धाराचा नसून, त्यास कांहों प्रमाणांत बेगडी व दांभिकपणाचे स्वरूप आलेलें होतें, आणि त्यानंतरही त्याने पेशवाईची सूत्रे आपल्या हात ठेवण्याकरिता व तीं गेल्यावर पुन्हा मिळविण्याकरितां अतीशय धडपड केली होती. थोडक्यात म्हणजे मुंज- राजा करारी पुरुष होता, व रघुनाथराव हा कच्चा व कलीपुरुष होता.