Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६९ )

 राजाभोज हा मोठा विद्वान, व विद्वानाचा भोक्ता असून तो स्वतः कवी


तों कालीदास हा स्नान, आन्हिक कर्म, वगैरे आटोपल्यावर घरी परत येण्यास 'निघण्यापूर्वी नदींतील मासे पकडून आपल्याजवळील उपवस्त्रात टाकीत आहे, असें त्यानें पाहिलें; तेव्हां त्यास अतीशय आश्चर्य वाटले, व, पुढे कालीदास आणखी काय करितो, हैं पहात तो, तेर्थेच उभा राहिला. इकडे कालीदासानें, • पकडलेल्या माशांसह त्या उपवस्त्राचा गुंडाळा करून तें खाकोटीस मारिलें, व तो थेट आपल्या घरी गेला. तेव्हां ब्राह्मणही मागोमाग परतून आपल्या ठिका- णावर गेला; त्यानंतर, आपली पूर्ण खात्री करून घेण्याकरितां, हा ब्राह्मण पुन्ह लागोपाठ तीन चार दिवस नदीवर गेला, व कालीदासाचा तोच नित्यक्रम त्याच्या पाहण्यांत आला; तेव्हां कालीदासाचे महत्व नष्ट करण्यास आतां योग्य संघी भाली, असा आपल्या मनाशीं विचार करून, त्यानें भोजराजास भसें सांगितले की, " कालीदास हा रोज क्षिप्रा नदीवर स्नानास जातो, आणि परत येतेवेळी आपल्या गणिकेकरितां नदींतून मासे पकडून घरीं आणितों; व तिला -देतो; कालीदास हा ब्राह्मण असून असे नीच कर्म करितों, तरी आपणास या • संबंधीची खात्री करून घ्यावयाची असल्यास, भापण नदीवर जावें, म्हणजे - सर्व प्रकार आपल्या दृष्टोप्सत्तीस येईल; वाटल्यास मीही आपणाबरोबर येतो. ब्राह्मणाचे हे भाषण ऐकून, भोजराजाने दुसऱ्याच दिवशीं सकाळीं नदीवर आण्याचे ठरवून त्याप्रमाणे तो त्या ब्राह्मणासह नदीवर गेला; तोंच कालीदास नित्याप्रमाणे, नदींतील मासे पकडून, व उपवस्त्रांत गुंडाळून, ते स्वाकोटीस मारून व परत फिरताना त्यास दिसला; त्याबरोबर भोजराजाने एकदम पुढे 'होउन त्यास विचारिलें:-
 भोजः -- कक्षायां किं १ ( कार्खेत काय आहे ? )
 काली : --मम पुस्तकं. ( माझे पुस्तक आहे )
 भोजः -- किमुदकं ? ( त्यांतून पाणी कां गळत आहे ? )
 काली : -- काव्येषु सारोदकं ( ते कवितेच्या सारांतील पाणी आहे. )
 भोजः -- किं गंध १ ( दुर्गंधी कां येते ? )
 काली . - - प्रतनु रावण वध संग्राम मृत प्राणि गंध. ( हल्लीं रामाचे रावण धार्चे युद्ध चालू असून त्यांत मरण पावलेल्या प्राण्यांची ही दुर्गंधी आहे.