Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६८ )

लाविलें. ( इ. सन १०५५) त्यानंतर भोजराजा लवकरच मृत्यू पावला.   त्यामुळे भुंजास अतिशय आनंद झाला; त्यानें ताबडतोब स्मशानांत यज्ञाची तयारी करून दिली, व तेथें त्या योग्याने जाऊन यज्ञास प्रारंभ केला; त्यावेळीं पूर्वी ठरल्याप्रमाणे भोजास त्या ठिकाणीं गुप्तपणे नेण्यांत आलें, आणि “योगी- महाराजांनीं भोजास जिवंत केलें" असें जाहीर करण्यांत आलें.
 ही बातमी ऐकून सर्व नगरभर जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला; मुंजानें आनंदातिशयानें लागलीच स्मशान भूमींत हत्ती पाठविला, व त्यावर बसून डंका निशाणासह भोज राजमंदिरात परत आला; त्यावेळीं पश्चात्तापानें शुद्ध झालेला मुंज त्यास वंदन करण्याच्या तयारीत होता; इतक्यांत भोजानें हत्ती- वरून उतरल्याबरोबर मुंजास साष्टांग वंदन केल; मुंजराजास गंहिवर आला, आणि त्याने भोजास कडकडून आलिंगन दिले; या वेळेपासून त्याचा स्वार्थ व लोभ नाहींसा झाला राज्य आसक्ती, व राज्य कारभार यावरून त्याचे लक्ष पूर्ण- प उडून गेलें; भोजानिपर्थी स्वतःच्या मुलाहूनही त्याला अधिक प्रेम वाटू लागले; त्याला भोजाच्या अंगीं अलौकिक कर्तृत्वशक्ती दिसू लागली; आपल्या मुलास राज्य न देतां भोजासच द्यावे, असा त्याने बेत टरविला, आणि लवक- रच सुमुहूर्त पाहून त्याने स्वहस्ताने भोजराजास गादीवर बसवून त्यास राज्याभि पेक केला; व अपल्या मुलास त्याच्या हवाली करून, तो स्वस्त्रीसह, आपलें पुढील आयुष्य ईश्वरसेवेत घालविण्याकरिता वनांत निघून गेला.
 हा भोजराजा मोठा न्यायी, धर्मशील व विद्या विलासी; असून एक लाख रुपायां- हून कमी, अशी देणगी त्याने कधीच कोणालाही दिली नाहीं, असा त्याचा लौकिक होता व त्याच्या दरवारी कालीदासादि नवपंडितरत्नांची एक सभा होती; कालिदास हा काली देवीचा मोटा निःसीम भक्त असून त्या देवीच्या साक्षात्काराची एक मोटी मनोरंजक गोत्र उपलब्ध आहे ती अशी की :- भोजराजाच्या दरवा- रात कालीदासामुळे कोणाचेही तेज पडत नसे; त्यामुळे द्वेपाने प्रेरित होऊन काली- दासाचा भानभंग करण्याची एक ब्राह्मण कवी वाट पहात होता. कालीदासाचा रोज क्षिना नदीवर स्नानास जाण्याचा नियम असे; त्याप्रमाणे एके दिवश तो नदीवर स्नानास गेथ अस्त हा ब्राह्मण हळूच त्याच्या पाठोपाठ गेला, आणि कालीदास तेथे काय करीत आहे, ते लक्ष्यपूर्वक अवलोकन करू लागला;-