Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६७ )

धारेवर स्वारी केली, आणि भोजराजाचा पराभव करून त्यास तेथून हाकलून


" मान्धाता स महीपतिः कृतयुगालंकारभूतो गतः ।
सेतुर्येन महोदधो विरचितः क्वासौ दशास्यान्तकः ॥
अन्ये चापि युधिष्ठिरप्रभृतयो याता दिवं भूपते ।
केनापि समागता वसुमती, मन्ये त्वया यास्यति ॥ १ ॥ "

 ( हे राजा ! सर्व पृथ्वीचा राजा, जो सत्य युगांतील अलंकारासारखा होता तो, मांधाता पण मृत्यू पावला आहे. श्रीरामचंद्र कीं ज्यानें महासागरावर सेतू बांधिला, व दशमुखी रावणाचा वध केला, तो पण आतां कोठें आहे ? त्या प्रमाणेच युधिष्टिरादि राजे पग स्वर्गाला गेले आहेत; या सर्वाधकों कोणाबरोबर ही पृथ्वी गेली नाहीं; पण मला वाटतें, ती तुझ्याबरोबर येईल खरी ! )
 भोजाचे हे पत्र वाचल्याबरोबर मुंजराजास एकदम पूर्ण उपरती झाली; आपल्या पापी कृत्याचा त्याला अत्यंत पश्चात्ताप झाला; आणि मी पुत्रवध केला, भातां माझ्या पापाचे क्षालन कशानें होईल ? असा त्यानें आपल्या राजगुरूस प्रश्न केला; त्यावर राजगुरूने स्पष्ट सांगितलें को, “राजा ! ही पुत्रहत्या आहे; हे महा-महा भयंकर पाप आहे; " जिवंत अमीप्रवेश " एवढाच कायतो फक्त एक मार्ग या पापाचे क्षालन होण्यास शिल्लक आहे; आणि आपण अग्नींत जिवंत प्रवेश केलांत, तरच आपल्या या मद्दा पापाचे क्षालन होईल; " १
 मुजराजास खरोखरच आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला होता; त्यामुळे तो स्वतःला अग्नींत जाळून घेण्यास तयार झाला, व त्याप्रमाणे तयारी करण्यास त्याने आज्ञा दिली; त्यावेळीं वत्सराजानें तं कृत्रीम शीर दृष्टी आड करून व प्रधान बुद्धिसागर यास हळूच भेटून घडलेले सर्व हकीकत त्यास कळविली व मी भोजास टार न मारितां गुप्तपणे एका विविक्षित स्थळीं जिवंत ठेविले असून तुमची आज्ञा असेल तर त्यास आणितों, असे सांगितले; तें ऐकून बुद्धिसागरास आनंद झाला; त्यानें, भोजास युक्तीनं जाहीर करावें असा विचार केला, व वत्सराजार्थी मसलत करून, एका मनुष्यास योग्याच्या वेषांत भुंजराजाकडे पाठवावें, व त्यानें भोजास जिवंत केल्याचे मीप करून त्यास मुंजराजास भेटवावें, असें ठरविले; त्याप्रमानें एक मनुष्य योगी बनून मंत्रराजास भेटला, व मी स्मशानभूमीत यज्ञ करून भोजान जिवंत करितों असें त्यानें सांगितलें;