Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६६ )

या उभयतांमध्ये वैमनस्य उप्तन्न झाले; तेव्हां कर्णानें भीमदेवाची मदत


घेऊन आणील तेंच खरे आहे. मी, माझे कर्तृत्व, हा अहंकार खोटा आहे. हे ईश्वरा ! तुझेच कर्तृत्व, सत्य-त्रिवार सत्य आहे ! असे म्हणून भोजानें स्वतःची उजवी मांडी चिरून तिच्यातून रक्त काढिले; आणि काडीची लेखणी करून वडाच्या पानावर एक पत्र लिहून तें त्यानें व सराजास दिले; आणि हें पत्र माझ्या काकास द्या, अशी विनंती करून तो त्यास म्हणाला :- " वत्सराजा ! धर्म हा सर्वांत श्रेष्ठ (मुख्य) आहे. शरीर नाशिवंत आहे; मृत्यूनंतर कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाहीं; पण त्यावेळीं धर्मच साह्यकारी होतो; परंतु असे असून सुद्धां दुष्ट मनुष्य धर्माला दूर करून अधर्माचा अंगिकार करितात ! पण अत्यंत बलाढ्य असून सुद्धां जो " धर्म " मानीत नाहीं, तो निर्बल आहे; व निष्गात शास्त्रवेत्ता असूनही जो पंडित धर्म जाणणार नाहीं, तो मूर्ख आहे. 'ज: मनुष्य स्वतः जिवंत असतानाही धर्म गुंडाळून टेवून, अनीति व दुष्ट कृत्ये रूपी महारोग नाहींसा करण्याचे कार्य करीत नाहीं, तो मनुष्य दुसन्या औषधा शिवायच्या भूमीत काय करील ? तुझी तुमच्या सारख्याच दुसऱ्या मनुष्याल मरतांना पाहता नव्हे, तुझा स्वत:च त्याला ठार करूं इच्छिता - पण असे असूनही तुझास त्याबद्दल दुःख वाटत नाहीं, यावरून तुमचें हृदय वज्राप्रमाणें कठीण असावें, असें वाटतें. जो मनुष्य, मग तो पूर्ण ऐश्वर्यांत असो, किंवा अगदी दरिद्री थितीत असो, चिंता, भय, व व्याधी, वगैरे सृष्टिक्रमाचा फेरा भविष्यकाळीं आरणावर येईल, असे जाणून, त्याप्रमाणे आपले आचरण ठेवितो, तोच खरा पंडित अथवा सूज्ञ हाणून गणला जातो. "
 भोजाच्या ह्या विस्तारपूर्वक अशा बोधपर भाषणाचे मनन केल्यावर वत्सराजास ईश्वराची भाति उत्पन्न होऊन त्याच्या अंतःकरणास द्रव आला; आणि भोजाचा वध न करिता तो त्यास नगरीत परत घेऊन आला; एका तळघरांत लपवून ठेविले व भोजाच्या मस्तकासारिखेच एक कृत्रिम कुंडल युक्त मस्तक तयार करवून ते घेऊन तो महर रात्रीनंतर मुंजराजाकडे गेला; व त त्याने त्याच्यासमोर ठेविल; त्यावेळी सुजाने त्यास विचारिले, " वत्सराजा, तुझ्या तरकारीवाराच्या भावाने मृत्यू पावण्यापूर्वी भोज कार्य लगाला ? " वत्सराजाने काहींही उत्तर दता भोजांचे पत्र त्याच्या पुढे टाकिलें; मुंजाने ते वाचले :-