Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ६५ ) फार काळ टिकले नाहीं. कारण चेदी प्रांताचा राजा प्रसिद्ध कर्णे व भोजराजा


राग आला; व तो वत्स राजास म्हणाला, तूं माझा धनी नाहीं नौकर आहेस; असे असून तूं माझा हुकूम अमान्य करू इच्छितोस काय ? वत्सराजानें विचार केला की, आता प्रसंग ओळखून त्याप्रमाणे वागले पाहिजे कारण सत्तेपुढे शहाणपण निरुपयोगी आहे; म्हणून त्यानें मुंज राजास सांगितलें कीं, महाराज मला आपली आज्ञा शिरसावंद्य आहे; मी आपल्या आज्ञेप्रमाणे आज रात्री भोजाचा व करितों; असे म्हणून तो भोजाकडे गेला, व त्यास आपणाबरोबर स्थांत बसवून देवीच्या मंदीराच्या मार्गास लागला ही हकीकत शहरांत कळल्यावर जिकडे तिकडे मोठी खळबळ उडाली, आणि भोजाची आई सावित्री हिने तर डून भयंकर आकांत केला, पण त्याचाही राजाच्या मनावर यत्किंचितसुद्धां सुपरिणाम झाला नाहीं.
 इकडे वत्सराजा भोजासह भुवनेश्वरीच्या मंदीराजवळ आल्य वर त्यानें रथ उभा केला, व तो भांजास म्हणाला:- हे भोज, मुंजराजाला कोणी ज्योतिषानें असे भविष्य सांगितले आहे कीं, तू पुढे उजनी येथे राज्य करिशील; त्यावरून तुझा काका भुज बार्ने तुला ठार मारण्याची मला आज्ञा केली आहे; आणि मी त्याचा तावेदार असल्याने ती मान्य करणे, हा माझा धर्म आहे, व त्याकरितां मी तुला या स्थळी घेऊन आलो आहे; वत्सराजाने है भाषण ऐकून भोज म्हणाला; वत्सराज, काळ बलवान् आहे. काळ करील तें दुसन्या कोणाच्याही करवणार नाहीं ; रामास वनवास प्राप्त झाला, बळीराजा बंधनात पडला, पांडवांना ते वर्षे अज्ञातवासाराह बनवास बडला, यादवांनीं आपसांत युद्ध करून कुलक्षय करून घेतला, रावणाला सहस्त्रार्जुनाच्या चंदींत रहावे लागले, आणि शेवटीं श्री रामचंद्राकडून त्याचा वध झाला, नळ राजाला कलीने आपला प्रभाव दाखविला, या सर्व गोष्टी काळाने घडवून आणिल्या आहेत. काळाच्या कर्तव्याकर्तव्यातून कोणी वाचले नाहीं, व कोणी कोणाला वाचवूही शकले नाहीं; मी तर जो सर्व शक्कीमान् आहे त्या प्रभूसच त्या दयाघन परमेश्वरालाच अनन्य भावाने प्रणाम करितों जलाचे स्थळ, स्थळाचे जळ, तृणाचा मेल, अणि मेरूवं तृग, अति शीतळता, व शीतळतेंत अभी, हे सर्व कर्तृलला दीन दयाळू परमेश्वराचेच आहे ईश्वर मनांत