Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६४ )

दामोदर याच्या मध्यस्थीने उभयतांमध्ये सलोखा घडून आला. तथापि हें सख्या


त्यानंतर त्याने आपला आश्रित बंगालचा राजा वस्सराज यांस ताबडतोब बोलावून घेतले, आणि "आजरात्री पहिल्या प्रहरी भुवनेश्वरीच्या देवालयांत भोजास घेऊन जाऊन तेथें त्यास ठार मार, व त्याचें शीर मला आणून दाखीव अशी त्यास वत्त्वराजास आज्ञा केली; मुंजाचे हे भाषण ऐकून वत्सराजाची स्थिती चमत्कारिक झाली, व तो मोठ्या नम्रपणानें मुंजास म्हणाला; मुंजराजा !' तुम्हांस माहीतच आहे कीं, भोजाजवळ द्रव्य नाहीं, त्याप्रमाणेच बलवान माणसे ही नाहींत; शिवाय भोज हा तुम्हांस पुत्रा समान आहे, व एखाद्या सेवकाप्रमाणे तुमची आज्ञा पाहून पराधीनपणाने तो पोट भरीत आहे; अशा भोजाला, ठार मारण्याचें कारण काय ? वत्सराजाचें हें भाषण ऐकून मुंज राजानें, ज्योतिषानें भोजाविषयीं वर्तविलेले भविष्य, त्यास सांगितले, तें ऐकून वत्सराजा त्यास म्हणाला:-

त्रैलोक्य नाथो रामोऽस्ति वशिष्टो ब्रम्हपुत्रकः ।
तेन राज्याभिषेके तु मुहूर्तः कथितो भवत् ॥
तन् मुहूर्ते रामोऽपि वनं नीतोऽवनी विना ।
सिताया दरोऽप्य भवद्वैरिंची वचनं वृथा ॥

 ( " श्री रामचंद्र, त्रैलोक्याधीश होता; व वशिष्ट मुनो, ब्रह्मदेवाचा मुलगा होता, आणि त्यानेच श्री रामचंद्राच्या राज्याभिषेकाकरितां मुहूर्त काढून दिला होता; पण त्याच मुहुवीनें श्री रामचंद्रास राज्य न मिळतां उलट वनवासाला जावें लागलें; वनवासति सीताहरण झाले; व अशा रीतीनें प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे वचनही निष्फळ झाले. " ) तर राजेंद्र ! या भिकार ब्राह्मणाचा त्या पुढे काय पाड ? म्हणून अशा ब्राह्मणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून राजकुमार भोज याला ठार मारून टाकण्याची इच्छा करणे भापणासारख्याख योग्य नाहीं; शिवाय भोजास मारून टाकिल्यास त्यामुळे प्रर्जेत असंतोष उसन होईल; निरनिराळ्या भानगडी उत्पन्न होतील, बंडे उपस्थित होतोल, आणि त्यामुळे कदाचित् आपणासही पदभ्रष्ट म्हावे लागेल; तरी या सर्व गोष्टींचा आपण पुन्हा एकदा शातपणाने विचार करावा; वत्सराजाच्या ह्या म्हणण्याचा मुजाच्या मनावर कोणताही सुपरिणाम झाला नाहीं; उलट त्यास अतिशयः