Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६३ )

याने भीमदेवावर स्वारी करून त्याचा पराभव केला व भीम देवाचा वकील


ज्या बऱ्या वाईट गोष्टी केल्या असतील त्या सर्व मला सांग " असे त्यास सांगि- त; त्यावरून त्या ज्योतिषाने त्याची पत्रिका पाहून भूतकाळीं त्यानें केलेल्या - सर्व बऱ्या वाईट गोष्टी त्यास निवेदन केल्या; त्या ऐकून मुंजास फार आनंद झाला, व त्यानें त्या ज्योतिषास पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केलें.
 त्यावेळी तेथे प्रधान बुद्धिसागर हा बसला होता. त्यानें मुंजराजास विनंती केली कीं आतां भोजाची पत्रिका ज्योतिषास दाखवावी; त्यावेळीं ज्योतिषानें • सांगितले की भोजास माझ्या समोर बोलवा; त्याप्रमाणें त्यास पाठशाळेतून बोला- वून आणिलें; भोज येऊन मुंजराजास नमस्कार करून मोठ्या नम्रतेनें उभा - राहिला; तेव्हां भोजाची मुखाकृती व पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले कीं, मुंजराजा ! या भोजाच्या मुखाकृतीवरील रेषा व जन्मपत्रिका यांचें वर्णन मी काय करूं ? याच्या भाग्याचं वर्णन करण्यास प्रत्यक्ष ब्रह्मदेवही असमर्थ आहे. तर मी मानव प्राणी तो काय सांगणार ? तथापि आपण मला आज्ञा "केली आहे तरी माझ्या अल्प मतीप्रमाणे कसे तरी सांगतों; असे म्हणून भोजास तेथून रवाना करून त्यानें त्याच्यासंबंधीं भविष्य कथन करण्यास सुरवात केली, व मुंजराजाही मोठ्या आतुरतेनें तो काय सांगतो तें लक्षपूर्वक ऐकत असला; ज्योतिषी म्हणाला:-

मुंजराजा ! " पंचाशतपंच वर्षाणि सप्तमासं दिनत्रयं ॥
भोजराजेन भोक्तव्यः स गौडो दक्षिणापथः " ।

 ( " पंचावन वर्षे, सात महिने, व तीन दिवस, हा भोजराजा गौड देशापर्यंत दक्षिण देशाचे राज्य करील. " )
 ज्योतिषाचे हे शब्द मुंजराजास अनीसारखे दाहक झाले; त्याचे तोंड फिक्के पडले, व त्यास चिंता उत्पन्न झाली; कारण त्यास भोजाच्या वयाचाच एक मुरगा असून आपल्यामार्गे त्यास राज्य मिळावें, अशी त्याची इच्छा होती - तथापि बाहेरून, कसे तरी समाधान झालेसे दाखवून त्यानें ती वेळ निभावून नेली; परंतु त्यास त्या रात्रीं शांत झोपही न लागता तो विचारमग्न झाला, व भोजाचा हरएक प्रकारें नाश करावा असे त्याने ठरविलें;