Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६२ )

- सोडून दिले. त्यांनंतर कांहीं दिवसांनीं भोज राजाचा जैन सेनापती कुलचंद्र - बाप सिंधुल यास वृद्धावस्था प्राप्त झाली होती; त्यामुळे आपल्यामागें आपण कोणास राज्य सोंपवावें, या बद्दल त्यास विचार उत्पन्न झाला; तेव्हां त्यानें : प्रधान बुद्धिसागर वगैरे दरबारी मंडळीस एकत्र जमवून विचारिलें कीं, " माझ्या मार्गे मी कोणास राज्यधिकारी करूं ?" वास्तवीक खरा हक्कदार भोज हा आहे; पण तो अझून अज्ञान आहे; ह्मणून जर मी मुंजाला राज्याधिकारी करणार नाहीं तर लोक माझी अपकीर्ती करितील; भोजास राज्य दिले तर तो त्याला सुखानें राज्य करू देतो, का ठार मारितो, का आणखी कांहीं करितो, कोणास ठाऊक ? शिवाय भोजास राज्य दिल्यामुळेच जर त्याचा मृत्यू झाला तर तो माझ्या कुळाचाच क्षय झाला. आणि तो करण्यास ही मीच कारणीभृत झालों, असें होईल; कारण -मुंज हा लोभी असल्याने तो लोभापायीं काय करील, याचाही नियम नाहीं, या बाबतींत शास्त्रे सांगतात कीं!—

लोभात् क्रोधो भवति, क्रोधा द्रोहः प्रवर्तते ।
द्रोहेण नरकं याति शास्त्रज्ञोऽपि विचक्षणः
मातरं पितरं पुत्रं भार्यां वा सुहृन्मणि
लोभाविष्ट हंति स्वामिनं वा सहोदर

 ( लोभापासून क्रोध उत्पन्न होतो; क्रोधापासून द्रोह उत्सन्न होतो; द्रोहापासून शास्त्रज्ञ व विचक्षक ही नरकास जातो; आणि लोभी अथवा लोभानें “घेरलेला मनुष्य स्वतःची आई, बाप, मुलगा, बायको, उत्तम स्नेही, स्वामी, -व सहोदर, यांचाही वध करितो. )
 तेव्हां अशा लोभी मनुष्याचा विश्वास धरून काय उपयोग १ असे म्हणून : प्रधान मंडळीच्या अनुमताने, त्यानें मुंजास राज्य देऊन भोजास त्याच्या मांडिवर दिले, व त्याच मुलाप्रमाणे पालन कर, आशा त्यास विनंती केली; • त्यानंतर सृष्टिक्रमानुसार तो लवकरच कालवश झाला.
 सिंधुलच्या मृत्यूनंतर मुंजराजा राज्य करीत असतां एकेवेळी दरबारांत एक निष्णात ज्योतिषी आला; आणि त्यानें मी ज्योतिषी असून, भूत, वर्तमान 'व भविष्य या तिन्हींदी काळांतील गोष्टी जन्मपत्रिका पाहून सांगू शकतो. "असे मंज राजामनिवेदन केले; त्यावरून मुंजराजाने त्यास "मी आजपर्यंत ज्या