Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६१ )

राजाचा पराभव होऊन त्यास भीमदेवानें कैद केलें, परंतु भीमदेवाने त्यास


होता; परंतु त्यास पुत्र संतती नव्हती; व त्यामुळे तो बराच उदास होता अशा स्थितीत एके वेळीं तो शिकार करण्यास गेला असतां मुंज या नांवाच्या गवतात त्याला एक नुकताच जन्मास आलेला मुलगा मिळाला; त्या मुलासा पाहून त्याला फार आनंद झाला, व ईश्वरानेंच आपणास हा पुत्र दिला असे समजून त्यास तो आपल्याबरोबर घेऊन राजमंदिरांत परत आला; व हाच पुत्रजन्म असें समजून त्याने नगरांत मोठमोठे उत्सव केले; हा मुलगा मुंज गवतांतून मिळाला म्हणून त्याचे नाव मुंज अर्से ठेविलें आणि आपली राणी- शृंगारसुंदरी इच्या हवालीं त्यास केलें; राणीनें त्याचें मुलाप्रमाणे सात व पालन पोषण केल्यावर त्यास आठव्या वर्षी गुरुगृहीं ठेवण्यांत आलें; इकडे : श्रीहर्षाची दुसरी राणी या वेळीं प्रसूत होऊन तिला मुलगा झाला; व त्याचे नांव सिंधुल असें ठेवण्यांत आलें. हर्षास पूर्वी मुलगा नसल्यामुळे मुंजास मुलगा समजून त्यासच पुढें राज्य देण्याचा त्यानें बेत केला होता; परंतु आता त्यास औरस पुत्र झाल्याने, त्यानें आपला पूर्वीचा बेत फिरवून सिंधुल यात राज्याधिकारी करावें, असें ठरविले; परंतु राणी शृंगारसुंदरी हिनें मुंजाचा याच्या जन्मा नंतरच्या प्रथम काळा पासून प्रतिपाळ केला असल्याने तिचे मुंजावर अत्यंत प्रेम होतें; त्यामुळे तिने मुंज यांसच राज्यपद द्यावें. असा भाग्रह धरिला; तेव्हां तिच्या म्हणण्यास कबूल होऊन त्यानें मुंजास गादीवर बसविलें, व पुढे लवकरच तो मृत्यू पावला.
 मुंज राजा गादीवर आल्यावर कांहीं काळपर्यंत तो आणि सिंधुल हे उभ- यतां सख्या भावाप्रमार्णे रहात होते परंतु मुंज हा अतीशय लोभी व स्वार्थी असून त्यानें अनीतीनें व क्रूरपणाने राज्यकारभार चालविण्यास त्याने सुरवात केली; त्यामुळे सिंधुलार्थी त्याचे पटेनासे झ.लें; शिवाय मुंजानें जुना व इमानी प्रधान बुद्धिसागर वगैरे मंडळीसही कामावरून दूर केलें, आणि पूर्ण अनियंत्रितपणे तो राज्य कारभार चालवू लागला; त्या मुळे प्रजेनें त्यास गादीवरून दूर करून सिंधुल यांस पूर्वीचे सर्व अधिकारी कामावर घेऊन प्रधान बुद्धिसागर वगैरेंच्या मदतीने त्याने गादीवर बसविलें व बराच काळ पर्यंत मोठ्या नीतीनें व ग्रहाण- पणाने राज्यकारभार चालविला; भोज हा पांच वर्षांचा झाला त्यावेळी त्याचा