Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६० )

या भोज राजाबरोबर अनहिब्बाडा येथील भीमदेवाचें युद्ध झाले, त्यांत भोज-


बाचे आहे.) त्यावरून मुंज राजानें तो बेत रहित केला; तथापि पुढे काहीं काळाने पुन्हां त्यास मोजाविषयीं मत्सर उत्पन्न झाला, तेव्हां भोजानें त्यास पुढील कविता लिहून पाठविली:-

"मान्धाता स महीपतिः कृतयुगालंकार भूतो गतः ।
सेतुर्येन महोदधौ विरचितः क्वासौ दशास्यान्तकः ॥
अन्ये चापि युधिष्ठिरप्रभृतयो याता दिवं भूपते ।
नैकेनापि समागता वसुमती मन्ये त्वया यास्यति ॥ "

 ( कृतयुगाला अलंकारभूत झालेला मांधाता राजा कालवश झाला, त्रेता युगांतील दहा तोंडाच्या रावणाला मारणारा व महासागरावर पूल बांधणार- श्री रामचंद्र नाहींसा झाला; त्याप्रमाणेच ( द्वापार युगांतील ) युधिष्ठिरादिकरून इतर राजेसुद्धां स्वर्गवासी झाले; परंतु ही वसुंधरा ह्यांपैकीं एकाबरोबर सुद्धा - गेली नाहीं; पण मला वाटतें ती तुझ्याबरोबर येईल. ) मुंजराजाही मोठा विद्वान व धूर्त होता; त्यामुळे भापल्या अंगीं उत्पन्न झालेल्या मत्सर व महत्त्वाकांक्षा; या संबंधाची आपल्या पुतण्याची ही व्याजोक्ती त्याच्या ताबडतोब लक्षात आली, - व त्या दिवसापासून त्याचा छळ करणे मुंजराजानें सोडून दिले;
 राजा कुंज उर्फ सिंधुराजा हा मृत्यु पावल्यावर त्याचा मुलगा भोज हा - गादीवर आला; राजा कुंज ब मुंज या नांवावरून, बांधलेले कुंजसागर व मुंजा - सागर असे दोन तलाव इल्लीं धार शहराजवळ अस्तित्वांत आहेत. राजा भोज - गादीवर आला त्यावेळीं त्याचे वय अवघें पंधरा वर्षाचे होते; या राजाची कार- कीर्द इ० सन १०१० ते १०५५ पर्यंत असून याच्याच कारकीर्दीत, राज्या- - रोहणानंतर लवकरच त्याने अवंती उर्फ उज्जयनी या शहराऐवज धार है शहर आपल्या राजधानीचे ठिकाण केले.
 या बाबतींत थोडीशी निराळी हकीकत उपलब्ध झाली आहे ती अशी:-
 उज्जयनी येथे सिंहल, या नांवाचा एक राजा राज्य करीत होता; या राजाची बरीच वृद्धावस्था झाली, तरी त्यास पुत्र संतती झाली नाहीं; तथापि ईश्वर कृपेनें पुढे त्यास एक मुलगा झाला त्याचे नांव त्यानें भोज असें ठेविले. सिंधुतलराजाच्या पूर्वी श्रीहर्ष या नांवाचा राजा तेथे राज्य करीत