Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५९)

चालुक्यवंशीय प्रसिद्ध विक्रमादित्य यास युद्धांत पाडाव करून ठार मारिलें होतें.


आग्रहाने विनंती केली; परंतु तिचा अनादर करून मुंजानें त्याच्यार्थी युद्ध केलें, व तो थेट तैलपाच्या प्रदेशावरही चाल करून गेला; त्याठिकाणी उभयतांमध्ये पुन्हा घोर संग्राम झाला, व त्यति मुंजराजाचा पूर्ण पराभव होऊन तैलपार्ने त्यास कैद केलें ; प्रारंभीं तैलपानें मुंजराजाची उत्तम बरदास्त ठेविली होती; अशा स्थितीत तैलपाची बहीण कुसुमावती उर्फ मृणालिनी हिवें त्याच्यावर प्रेम बसले, व त्याने तिच्यामार्फत तेथून आपली सुटका करून घेण्याचा यत्न केला; परंतु ही गोष्ट मृणालिनीनें तैलपास कळविली; तेव्हां त्याने मुंजराजाचा शिर- च्छेद करविला; राजा मुंज हा शिवभक्त होता; त्याचा पुष्कळ काळ स्वाऱ्या व युद्धे करण्यांत खर्च झाला, तथापि त्यानें पुष्कळ इमारती व तलाव बांधिले; धार शहराजवळील मुंजसागर तलाव व मांडू उर्फ मंडपदुर्ग येथील मुंज तलाव व मांधाता, महेश्वर व कुब्जासंगम येथील घांट त्यानें बांधिले असून धार व उज्जयनी येथेही त्यानें अनेक सुंदर इमारती बांधिल्या; त्याच्या दरबारति, "नवसाहसांक चरित्र' या काव्याचा कर्ता पद्यगुप्त, हलायुध, जैनकवि धनपाल, 'दशरूप' नाटकाचा कर्ता धनंजय, व त्याचा भाऊ आणि त्या नाटकावरील 'दशरूपावलोक' या टीकेचा कर्ता धनिक हीं विद्वद्रत्ने होती; राजा मुंज यास पुत्र संतति नसल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ कुंज, उर्फ सिंधुराज ( यांस नवसाहसांक, कुमार व नारायण, अशींही नावे होतीं. ) हा गादीवर आला. परंतु कुंज हा लहानपणीं स्वभावानें अतीशय अनियंत्रित होता; त्यामुळे मुंज हा त्यास विशेष कडक रीतीनें वागवीत असे; त्यावरून तो रागानें गुजराथेंत निघून गेला व काही काळ तिकडे राहिल्यावर पुन्हां स्वदेशीं परत आला; तेव्हां मुंजराजानें त्यास प्रतिबंधांत ठेविलें व तेथें असतांनाच त्याचा मुलगा प्रसिद्ध भोजराजा याचा जन्म झाला; राजा मुंज यास पुत्रसंतति नसल्यामुळे भोजाच्या जन्मामुळे त्यास फार आनंद झाला; पुढे एका ज्योतिषानें त्यास य मुलाच्या हातून तुझा नाश होईल' असे भविष्य सांगितल्यामुळे त्यानें भोजाच छळ करण्यास सुरुवात केली, इतकेंच नव्हेतर त्यास ठार मारण्याची आज्ञा केली; परंतु वररुचीने राजास सांगितले की " पंचाशत्पंच वर्षाणि सप्तमासं दिनत्रयं । भोजराजेन भोक्तव्यः सगौडो दक्षिणा पथः ।। " ( भोजराजाने गौड देशापर्यंत दक्षिण देशाचे पंचावन वर्षे सात महिने तीन दिवस राज्य करावें अथवा कराव-