Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)

चालुक्य, चेदी व गुजराथ देशाच्या राजांशीं युद्धप्रसंग केले होते, आणि


व बोषप्रद आहे; हा वंश भग्निकुळ रजपुतांपैकी असून हे घराणे पूर्वी अबूच्या पहाडाजवळील अचलगड व चंद्रावती नगर येथे राज्य करीत होतें; या घरा-- ण्याचा मूळ पुरुष उपेंद्र उर्फ कृष्णराज ( कारकीर्द इ० सन ८०० ते ८२५: पर्वत) हा असून त्यानंतर वैरसिंह, सियक, वाक्पति, वैरसिंह (दुसरा) व सीयक दुसरा हे अनुक्रमें गादीवर आले; सोयकास श्री हर्ष, राजाहर्ष, श्रीहर्षदेव ब सिंहभट अशीं नांवें आहेत. हा मोठा पराक्रमी असून त्यानें हूण लोकांचा व मान्यखेट अथावा मालखेड येथील राजाचा पराभव केला होता; ( कारकीर्द इ० सन ९४१ ते ९७३ ) हर्षाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा सियक हा गादीवर आला; त्यास वाक्पति, उत्पलराज, अमोघवर्ष, पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, नरेंद्र व मुंज वगैरे नाव असून त्यास शेवटच्या नांवानेंच संबोधण्यात येतें; त्यास 'मुंज' हे नांव पडण्याचे कारण असे आहे, कीं, राजा हर्ष हा एक दिवस नदी- कोठी सहल करीत फिरत असतांना नदीच्या आसपासच्या ' मुंज' या नांवाच्या गवतांत त्यास एक नुकताच जन्मलेला, नाल-वार सहितचा म्हणजे प्राणी जन्मल्या- बर त्याचा नालच्छेद करितात तोही केलेला नव्हता अशा स्थितीचा एक मुलगा त्याच्या दृष्टीस पडला; तेव्हां त्यानें त्यास घरीं आणून, त्याचा नालच्छेद केला,. व त्याचे नांव मुंज अर्से ठेवून, त्यास मुलगा समजून त्याचा प्रतिपाळ केला; यानंतर कांहीं काळाने हर्ष राजास मुलगा झाला; तो मुलगा एक दिवस अचा-- नक नाहींसा झाला, व तपास करितां करिता शेवटीं तो एका कुंजात सांपडला;. त्यावरून त्याचें नांव कुंज असें ठेविले. हा मुंज राजा मोठा पराक्रमी असून तो स्वतः हि विद्वान् व कवि होता. त्याने कर्नाट, लाट, केरल व चोल राजांचा,. व त्रिपुरीचा चेदिराजा युवराज यांचा पराभव केला; आणि चालुक्य राजा दुसरा तैलप याच्यावर सतत सोळा स्वाया केल्या, आणि अशा एका मोहिमेत एकदांतर त्याने तैलपाचा पूर्ण पराजय करून त्यास कैदही केले; परंतु मोठ्या उदारपणाने त्याने तैलपास बंधमुक्त करून स्वदेशी जाण्यास परवानगी दिली; (इ. सन ९७५) त्यानंतर, हा डाव मनांत ठेवून तैलपार्ने, वीस वर्षांन, इ. सन ९९५ मध्ये माळवा प्रांतीं मुंजराजावर पुन्हा स्वारी केली; त्यावेळीं मुंजाचा प्रधान रुद्रादित्य याने त्यास तैलपाबरोबरील युद्धप्रसंग टाळण्याबद्दल मोठ्या