Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५७ )

वर्षे राज्य केले; याच्या कारकीर्दीत इ. सन १०२४ मध्यें गन्नवी महंमद बाने सोमनाथावर स्वारी केली. त्या वेळीं त्याच्याबरोबर युद्ध करण्याची चामुंड याची तयारी नव्हती; त्यामुळे त्यास भापली राजधानी सोडून पळून बार्णे भाग पडले; तथापि त्याचा वढील मुलगा वल्लभसेन व नातू भीमसेन या उभयतांनीं महंमदाचा मोठ्या निकरानें प्रतिकार केला, व त्याचें भजमा - तीन हजार सैन्य कापून काढिले; तरीसुद्धां अखेरीस मुसलमानी सैन्यापुढे त्यांचा टिकाव न लागतां त्यांना माघार घेणे भाग पडले; व सोमनाथाच्या -मंदिरांतून महंमदानें भर भक्कम लूट मिळविली; त्यानंतर त्यानें चामुंड राजावर स्वारी केली, व त्याच्या राजधानीचे शहर, अनहिलापट्टण, हस्तगत करून घेऊन त्याचे सर्व राज्य आपल्या ताब्यांत घेतले; राजा चामुंड यास पदभ्रष्ट केलें, आणि त्याच्या राज्यावर आपल्यातर्फे त्याचा दुसरा मुलगा व वल्लभ सेनाचा भाऊ दुर्लभसेन याची स्थापना करून तो परत गेला. * हिंदुस्थानच्या 'पूर्व इतिहासांत ही गोष्ट विशेष महत्त्वाची म्हणून गणली गेलेली आहे; कारण . त्या काळानंतर पुढे गुजराथ प्रांत मुसलमान लोकांच्या ताब्यांत गेलेला आहे.

 गज्नत्री महमुदाने गादीवर बसविलेला राजा दुर्लभ हाही विशेष कर्तृत्वाचा असून तो नेहमीं साधुवृत्तीने रहात असे; अनहिलवाडा येथील दुर्लभ सरोवर त्यानेच बांधिलेले आहे; तथापि त्याची कारकीर्द फक्त दोन वर्षांची असून इ० - सन १०२६ मध्ये त्याचा पुतण्या व वल्लभाचा मुलगा भीमदेव हा गादीवर आला; हा मोठा शूर व प्रसिद्ध असून तो विख्यात असा धारा नगरीचा राजा भोज, + याचा समकालीन होता. हा भोज राजा मोठा शूर असून त्याने


 * या बाबतींत हिंदु इतिहासकार व मुसलमानी तवारिखकार यांच्या लिहिण्यांत महत्त्वाचा फरक आढळून येतो; तो असा कीं गज्नवी महमुदाच्या वरील स्वारीच्या वेळीं अनहिलवाडा येथे चामुंड नव्हे पण भीमदेव हा राज्य 2 करीत होता, असे हिंदी इतिहासकारांचे मत आहे; उलट पक्षीं, या वेळीं त्या ठिकाण भीमदेव नव्हे पण चामुंड हा राज्य करीत होता, असें मुसलमानी तवारीखकारांचं मत आहे.
 + राजा भोज हा माळवा प्रांतांतील परमार ऊर्फ पवार या राजकुलां- -तील महान् प्रसिद्ध असा पुरुष होऊन गेला; त्याचे जन्मचरित्र मोठें मनोरंजक