Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५६ )

व त्यांना घेऊन तो चीनमध्ये परत गेला; अशा रीतीनें इ० स० ६४६ मध्ये दुसरा शिलादित्य मृत्यू पावल्यानंतर लवकरच त्याच्या सर्व राज्यभर अंदाधुंदी माजली. राज्यांतील निरनिराळे प्रांत स्वतंत्र होण्याच्या मार्गास लागले, आणि गुजराथ प्रांतावरील त्याचा अंमल नष्ट होऊन तेथील मांडलिक राजा धारसेन हा स्वतंत्रपणे त्या प्रांतावर राज्य करूं लागला. ( ई० सन ६४६ ).
 हे वलभी घराणे इ० सन ४५० च्या सुमारास काठेवाड प्रांताच्या पूर्व- भागांत वलमी येथे स्थापन झाले असून धारसेन हा त्या घराण्यांतील बारावा पुरुष होता. प्रसिद्ध प्रवासी ह्यएनसंग हा वल्लभी येथे गेल्यावेळी त्याला तें शहर सुस्थितीत असल्याचे आढळून आलें होतें. घारसेनच्या मृत्यूनंतर वल्लभी घराण्यांतील एकंदर सात पुरुष गादीवर आले; त्यापैकीं शिलादित्य सहावा. हा शेवटचा राजा असून, त्याच्या कारकीर्दीत अरब लोकांनी सिंध प्रांतावर स्वारी- करून तें राज्य नामशेष करून टाकिले; त्यानंर गुजराथेत ' चावडा' या नांवाचे एक घराणे उदयास येऊन इ० सन ९४१ पर्यंत त्या घराण्याकडे गुजराथची सत्ता कायम राहिली. त्यांच्या राजधानीचे शहर अनहिलवाडा, अथवा अनहि- लपट्टण हॅू होतें; इ० सन ९४१ नंतर गुजराथची राजसत्ता चालुक्य अथवा सोळंकी घराण्याकडे आली.
 चावडा वंशांतील शेवटच्या राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलीचा मुलगा मूळराज हा गादीवर आला. त्याचा जन्म 'मूळ' नक्षत्रावर झाला, म्हणून त्याचे नांव मूळराज असे ठेविले; त्याच्या आईचे नाव लीलादेवी हैं असून तो उदरांत असतानाच ती मृत्यू पावली, व त्यानंतर त्यास तीच्या उदरांतून काढून घेतले. मूळराज हा मोठा शूर असून त्यानें काठेवाड, कच्छ, व लाट, हे प्रदेश जिंकून घेतले, व अजमीर येथील राजा विग्रह याचा पराभव करून त्याच्यावर आपले वर्चस्व स्थापन केले; त्याप्रमाणेच त्याने महाराष्ट्र देशावर स्वारी करून कल्याणचे राज्य आपल्या अमलाखालीं आणिलं, हा राजा दानधर्मशील असून त्याने सिद्धपुर येथे 'रुद्रमहालय' हे देवालय बांधविले. मूळराज हा इ. सन ९९७ या वर्षी मृत्यु पावला, व त्याचा मुलगा चामुंड हा गादीवर आला; हा राज्यकर्ताही मोठा हुषार व नीतिमान् असून त्याने आपल्या घराण्याच्या लौकिकांत बरीच भर घातली; त्याने अजमासें २९