Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

त्यामुळे त्यास माळवा प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित करितां आली नाहीं. शिवाय या गोष्टीमुळे पुलिकेशी व शिलादित्य यांचे वांकडे आले; आणि पुलि- केशी यानेही शिलादित्यास, तो आपली सत्ता नर्मदानदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतां, भयंकर प्रतिरोध करून इ. सन ६१० मध्ये त्याचा पूर्ण पराजय केला. त्यामुळे पूर्वकाळच्या गुप्त साम्राज्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडून त्या उभयतांस विभाग- णारी रेषा म्हणजे नर्मदानदी, दी निश्चित झाली. दुसरा शिलादित्य हा मोठा पराक्रमी व थोर राज्यकर्ता असून त्याने सर्व उत्तर हिंदुस्थान व गुजराथ प्रति आपल्या अमलाखालीं आणिला; तो मोठा धार्मिक असून त्याने इ. सन ६४० मध्ये प्रयाग येथे एक मोठी थाटाची धर्मपरिषद भरविली होती; व त्याकरितां निरनिराळे मांडलीक राजे रजवाडे, व ठिकठिकाणचे मोठमोठे विद्वान्, व पंडित मंडळी, यांनाही भामंत्रर्णे करून त्या सभेस आणविलें होतें. या सभेसही उपरीनिर्दिष्ट चिनी प्रवासी एनत्संग हा हजर असून त्यानें या परिषदेसंबंधीं अभिनंदनपर उद्गार काढिलेले आढळतात.
 त्या नंतर सहा वर्षांनींच इ. सन ६४६ मध्ये शिलादित्य मृत्यू पावला, आणि त्याचा ब्राह्मण प्रधान अर्जुन यानें तें राज्य बळकाविलें; तथापि तो फार क्रूर क नालायक असल्यामुळे त्यास फार दिवस राज्यसुख लाभले नाहीं. शिलादित्य हा अत्यंत कर्तबगार व प्रसिद्ध राजा होता; त्यामुळे त्याच्या दरबारीं परदेशीय राज्यकर्त्यांचे वकीलही येण्याचा परिपाठ होता; त्याप्रमाणे वांग ह्यूएन्त्संग या नांवाचा एक वकील चीनच्या बादशहाकडून त्याच्या दरबारांत येण्याकरिता चीनमधून निघाला, व तिबेट नेपाळ मार्गानें तो हिंदुस्थानांत येऊन दाखल झाला. तेव्हां शिलादित्य मृत्यू पावल्याचे व त्याचें राज्य त्याच्या ब्राह्मण प्रधानाने हिरावून घेतल्याचे वर्तमान त्यास समजले, इकडे या ब्राह्मण प्रधानास - प्रधान अर्जुन यास या चिनी बकी- लाच्या आगमनाची खबर मिळाली; त्याबरोबर त्यानें त्या वकिलास, व त्याब- रोवरील परिवारास पकडिले; व त्यास एकट्यास जिवंत ठेवून बाकीच्यांस ठार मारिलें; व त्याचा छळ करण्यास प्रारंभ केला. तथापि ह्यूएन्संग हा कसा बसा आपला जीव घेऊन नेपाळच्या हद्दींत निसटला, व नेपाळी व तिबेटी लोकांची मदत घेऊन त्यानें अर्जुनावर स्वारी केली; तिरहुत शहर हस्तगत करून घेतले; त्याचा पूर्ण पराजय करून त्यास व त्याच्या कुटुंबातील मनुष्यांस पाडाव केले;