Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५४ )

राजा हर्ष हा स्वतः विद्वान्, वैयाकरण, व काव्यकर्ता असून नागानंद, रत्नावली, व प्रियदर्शिका, हीं नाटकें त्यानें रचिलेलीं आहेत; शिवाय तो विद्वा- नांचा मोठा भोक्ता असून प्रसिद्ध बाण कवि हा त्याच्या दरबारात होता; या बाण कवीनें 'हर्ष चरित् ' हैं सुंदर काव्य रचिलेले असून तें सुप्रसिद्ध आहे. सारांश, हा राज्यकर्ता मोठा दानशूर, उदार, प्रजावत्सल, व धीरोदात्त असून त्याच्या अंगीं वसत असलेल्या अनेक थोर व अलौकिक सद्गुणामुळे त्यानें इति- हासांत आपली कीर्ति अजरामर करून ठेविली आहे. तो इ० सन ६४८ मध्ये मृत्यू पावला.
 त्यानंतर गुप्त घराण्यांत आदित्यसेन या नांवाचा एक बराच पराक्रमी राजा निर्माण झाला; व त्यानें अश्वमेघ यज्ञ करून गुप्त घराण्याचा पूर्व लौकिक बऱ्याच प्रमाणांत सजीव केला. तथापि त्याच्या मृत्यूनंतर पुढे लवकरच गुप्त घराणे नामशेष झाले, व त्या घराण्यांतील सार्वभौम सत्ता मालव घराण्याच्या हातीं गेली.
 या मालव बराण्यांतील प्रसिद्ध राज्यकर्ता यशोवर्धन, अथवा विक्रमादित्य, हा मोठा शूर व राजकारणपटु असून त्याने आपल्या राज्याची पुष्कळ भरभराट केली, व थेट काश्मीर पर्यंतचा प्रदेश आपल्या सत्तेखालीं आणिला; आणि सतत पन्नास वर्षे राज्य करून इ. सन ५८३ च्या सुमारास तो मृत्यू पावला; व त्याचा मुलगा शिलादित्य हा गादीवर आला; परंतु, त्यानें अजमासें दहा वर्षे राज्यसूत्रे चाल- विल्यावर इ. सन ५९३ मध्ये पंजाबांतील ठाणेश्वर येथील राजा प्रभाकर वर्धन यानें, त्यास पदभ्रष्ट केले; तेव्हां शिलादित्यानें काश्मीरचा राजा प्रवरसेन याची मदत मिळविली. आणि प्रभाकरवर्धनाश युद्ध करून त्यानें आपली गादी परत मिळवली; परंतु प्रभाकरवर्धनचा मुलगा राज्यवर्धन याने इ. सन ६०६ मध्ये त्याचा पराजय केला; व मालब घराणें नामशेष करून कनोज पराण्याची स्थापना केली; तथापि, त्यासही राजपद फार दिवस न लाभतां वो कनोज येथे मारला गेला; व त्याच्यामार्गे त्याचा दुसरा भाऊ हर्षवर्धन हा " दुसरा शिलादित्य" असा किताब धारण करून राज्यावर आला. यावेळीं दक्षिणेंत चालुक्य घराणे राज्य करीत असून या घराण्यांतील प्रसिद्ध राजा पुलिकेशी हा माळवा प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता; परंतु त्याचा दुसऱ्या शिलादित्याने प्रतिकार केला;