Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५३ )

वर्ष हा आपल्या पूर्वजांच्या सांप्रदायाप्रमाणे अशा प्रकारचे महोत्सव सतत तीस वर्षे करीत आला होता; ते दर पांच वर्षांनी एक वेळा होत असत, आणि त्यावेळीं दर गेल्या पाच वर्षांत सरकारी खजिन्यांत जमा झालेली सर्व संपत्ति गोरगरीब, याचक, व यति, भिक्षूक व संन्यासीवर्ग, यांच्यामध्ये वांटण्यात येत असे. या उत्सावाच्या प्रसंगी त्याच्या राज्यांतील निरनिराळ्या भागांतून पुष्कळ जनसमूह या ठिकाणी एकत्र होत असे, व त्याची संख्या पांच लाखपर्यंतही जात असे. या महोत्सव ६४-६५ दिवस चालत असे; त्यांत पहिल्या दिवशीं बुद्ध, दुसऱ्या दिवशी सूर्य, व तिसन्या दिवशीं शिव यांच्या नांवाने देणग्या वांटण्यांत येत असत; चवथ्या दिवर्शी दहा हजार बुद्ध भिक्षूंस प्रत्येकीं सोन्याच्या शंभर मोहोरा, एक मोतीं व एक वस्त्र याप्रमाणे देणगी देण्यांत येत असे;- पांचव्या दिवसापासून पुढे सतत वीस दिवसपर्यंत ब्राह्मणांस व पुढे दहा दिवसपर्यंत विधर्मियांस देणग्या देण्यास येत असत. त्यानंतर सतत - एक महिना गरीब, निराश्रित व पोरकीं मुलें वगैरेंना निरनिराळया प्रका- रच्या देणग्या देण्यांत येत असत; व यावेळीं युद्धविषयक सैन्य सामुग्री व हत्ती बोडे, यांशिवाय इतर असें स्वतःचें जडजवाहीरसुद्धा तो या महोत्सवात बेणगीरूपानें बांटीत असे; या राजाच्या धर्मशीलत्वाविषयीं अशी एक गोष्ट प्रसिद्ध आहे कीं, अशा एका धर्मोत्सवांतील देणग्या व धर्मादाय यांमुळे त्याच्या - खजिन्यातील सर्व संपत्ति संपून गेली, इतकेंच नव्हे तर, त्याचे स्वत. चे नड- वहीर व अलंकार भूषणें हीं नाहींशीं होऊन गेलीं; तेव्हां अखेर त्याने आपली - बहीण राजश्री हिच्याकडून एक जुना पोषाख मागून घेतला, व तो अंगावर चढवून त्याने बुद्धाची पूजा केली; आणि अशा रीतीनें आपली संपत्ति खर्च झाल्याबद्दल त्यास अतीशय आनंद व समाधान वाटले; तथापि अशा या महो- त्सवाच्या दिवसांत एके वेळीं राजा हर्ष हा स्तूपावरून खालीं उतरत असतो एक मनुष्य त्याचा प्राणनाश करण्याकरितां हातांत जंबिया घेऊन त्याच्यावर चाल करून आला; परंतु त्याचा तो प्रयत्न यशस्वी होण्यापूर्वीच सुदैवाने त्यास भोवतालच्या लोकांनी पकडलें; तेव्हां त्यास विचारितां त्याने " जैन व ब्राह्मण लोकांनी हे कृत्य करण्यास मला उचुक्त केले " असे सांगितले; त्यावरून शुष्कळांना पकडून त्यांती मुख्य मुख्य पुढाऱ्यांचा शिरच्छेद करण्यांत आला, स्व. पांच सामीलगारांना हद्दपार करण्यांत आले.