Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )

या नव्या पंथाचा उत्पादक 'नागसेन' हा असावा अशी समजूत असून लाख महायान व मूळच्यांस हीनयान पंथ, अशी संज्ञा प्राप्त झाली. राजा हर्ष हा पहिल्यानें हीनयान सांप्रदायाचा होता; परंतु पुढे तो महायान सांप्रदायी बनला ; : व प्राणिहिंसा बंद करण्याकरितां व लोककल्याण साधण्याकरिता त्यानें निर निराळ्या प्रकाराने अश्रांत परिश्रम घेतले. प्राणिहिंसेचे गुन्ह्यास देहांत शिक्षा करण्याचा त्याने निर्बंध घातला, व साम्राट अशोकाप्रमाणे आपल्या सर्व राज्यांत प्रवाशांकरिता धर्मशाळा, व गरीब लोकांकरितां आश्रयस्थाने बांधून रोगी व अजारी लोकांकरितां शहरोंशहरी व खेडोखेडी औषधालये स्थापन केली; व तेथेंः वैद्यांची व औषधपाण्याची मोठया उदारपणानें उत्तम व्यवस्था ठेविली; त्याप्र- माणेच ठिकठिकाणीं हिंदू व बौद्ध लोकांच्या पुष्कळ व निरनिराळ्या धार्मिक संस्था निर्माण करून त्यांनाही त्याने मोठ्या सढळ हाताने उत्तेजन दिले; या काळांत परस्पर तीव्र द्वेष अथवा मत्सर फारसा आढळून येत नसे; तथापि क्वचित्प्रसंगी धर्मद्वेपमूलक गोष्टी घडत असून त्यासंबंधींची एक गोष्ट ह्यूएन्त्संग याने आपल्या प्रवासवृत्तांत लिहिली आहे ती अशी कीं, "मध्य बंगाल प्रांताचा राजा शशांक: हा बौद्धधर्मद्वेषी असून त्यानें बुद्धगया येथील बोधिवृक्ष खणून जाळून टाकिला; ( तथापि पुढे काहीं दिवसांनीं मगध देशाचा राजा पूर्णवर्मा यानें नवा बोधि-- वृक्ष पुन्हा लाविला असा उल्लेख आढळतो. ) पाटलीपुत्र शहरांतील बुद्धाच्या पाषाणाच्या पादुका फोडून टाकिल्या, आणि तेथील मठांचा नाश करून यतींना हांकलून दिले; परंतु राजा हर्ष हा हिंदू, बौद्ध, व जैनधर्मियांनां समसमान वागवीत असे, व त्या सर्वांच्या धर्मसंस्थांचा सारख्या रीतीनें उदारपणाने प्रतिपाळ करीत असे इतकंच नाहीं तर खुद्द त्याच्या कुटुंबातही काहीं माणसें बौद्धधर्मी, कांहीं सूर्योपासक, व कांहीं शिवभक्त होती; आणि कोणत्याही प्रकारचा धार्मिक. मतभेद लक्षात न ये तो सर्वांना मोठ्या प्रेमाने व समान दृष्टीने वागवीत होता; तथापि त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटीं वौद्धधर्मीय लोकानां व संस्थानांच त्याच्याकडून विशेष उत्तेजन मिळत असे, असे निदर्शनास येतें.
 या प्रसिद्ध राज्यकर्त्याने गंगा व यमुना या नद्यांच्या संगमावरील अलाहा-- बाद उर्फ 'प्रयाग' या क्षेत्रांत इ० सन ६४४ मध्ये एक धार्मिक महोत्सव केला; त्यावेळी एनत्संग हा तेथे हजर असून त्याने वर्णन केलेल्या हकीगतीवरून तत्कालीन सुबत्तेची व सांपत्तिक मुस्थितीची योग्य कल्पना करितां येते. राजा