Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५१ )

स्त्रिया निर्माण होऊन त्या गहन अशा धार्मिक बाबतींत व मोठ्या राज्याच्या कारभारांत कसा व किती प्रमुखत्वानें भाग वेल असत, याचें उदाहरण म्हणून ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी असून पूर्व दाखला म्हणून तिचा कारणपरत्वें नामनिर्देश करण्यांत येत असतो.
 प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएनत्संग हा इ. सन ६३० व इ. सन ६६४ मध्ये हिंदुस्थानांत आला होता; त्याच्या प्रवासवर्णनावरून असें दिसतें की, हर्षाच्या कारकीर्दीचा पूर्वकाल युद्धांत गेला व पुढील शांततेचा उत्तर काल धर्मप्रसारांत गेला. त्यानें आपल्या पूर्ववयांत उत्तर हिंदुस्थान व बंगाल प्रांताचा कांहीं भाग आपल्या हस्तगत करून घेतला; परंतु दक्षिणेकडे, चालुक्यवंशीय दुसऱ्या पुलिकेशीच्या कडक बंदोबस्तामुळे तिकडील मोहीमे बरून त्यास माघार घेऊन परत येणे भाग पडले; ( इ. सव ६२० ) त्या- नंतर आनंदपूर, कच्छ, व दक्षिण काठेवाड, या प्रतिच्यिा राज्यकर्त्यानां - त्याने आपल्या नियंत्रणाखालीं आणिलें; इ. सन ६४३ मध्ये त्याने गंजम प्रांतावर आपली शेवटची स्वारी केली, आणि हिमालय पर्वतापासून नर्मदा- नदीपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.
 राजा हर्ष याचा अजमासे सदतीस वर्षांचा पूर्वकाळ युद्धांत गेला; परंतु त्यानंतरच्या काळापासून धर्माकडे व परलोक साधनांकडे त्याच्या मनाची प्रवृत्ति वळली. बौद्ध धर्मांत हीनयान व महायान असे दोन सांप्रदाय आहेत; त्यांपैकी हीनयान हा जुना पंथ असून महायान हा त्यानंतर उत्पन्न झाला आहे; या संबंधीची विस्तृत माहिती डाक्टर केर्न यानें आपल्या " Manual of Indian Budhism" या ग्रंथांत दिलेली असून त्यावरून असे दिसते कीं, गौतमबुद्धाला आत्म्याचें अस्तित्व मान्य नसून मोक्ष म्हणजे निर्माण होय असं त्या दें मत होतें; आणि मनुष्याने सर्व संसार सोडून अरण्यांत जाऊन राहणे व पूर्ण कर्म संन्यास करणे, हे या धर्माचे ध्येय आहे असें त्याचे म्हणणे होतें, तथापि गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांमधील कांहींना हे तत्त्व पसंत न पहून त्यांनीं भक्तिधर्माचा- म्हणजे भक्तिमार्गाचा अनुवाद करण्यास सुरवात केली, आणि वैदिक धर्माप्रमाणं विभूती पूजा करण्याचा ते उपदेश करूं लागले; मनुष्याने कर्मसंन्यास न करिता कर्मे करीत रहावें, लोकांवर उपकार करावे, व त्यांच्या उपयोगी पडत रहाव, या मताचा प्रसार करण्यास त्यांनी सुरवात केली;