Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)

प्रस्थापित केलें, व गुप्तघराणे नामशेष करून त्यांच्या सार्वभौम सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हस्तगत करून घेतलीं.


 वरील काळानंतर लवकरच, म्हणजे इ. सन ६०० च्या सुमारास पंजाब मधील ठाणेश्वर येथील राजा प्रभाकरवर्धन हा आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमानें बराच प्रसिद्धीस आला. त्यास राज्यवर्धन व हर्ष असे दोन मुलगे होते; त्यांपैकी वडील हर्षवर्धन यास त्याने मोठी फौज देऊन आपल्या राज्याच्या वायव्य सरहद्दीवरील हूण लोकांचा बंदोबस्त करण्याकरिता पाठविलें होतें, व त्यानंतर धाकटा मुलगा हर्ष याचीही तिकडे रवानगी केली होती; मध्यंतरीं हीं मुळे परत येण्याच्या पूर्वीच प्रभाकरवर्धन आजारी होऊन मृत्यु पावला; त्यामुळे राज्यवर्धन परत आल्यावर गादीवर बसला; त्यास राजश्री या नांवाची एक बहीण असून ती कनोजाधिपति गृहवर्मा यास दिलेली होती; या गृहवम्याचे व माळव्याच्या राजाचे वांकडे येऊन त्याने गृहवर्म्यास ठार मारिलें, व राजश्री हीस प्रतिबंधांत ठेविलें; राज्यवर्धन परत आल्यावर त्यास ही हकीकत कळली; तेव्हां आपणाबरोबर दहा हजार घोडेस्वार घेऊन तो आपल्या बहिणीची सुटका करण्याकरितां तिकडे गेला, आणि त्यानें मालवाधिपतीचा पराभवही केला; परंतु त्याचा स्नेही मध्य बंगाल प्रांताचा राजा शशांक यार्ने विश्वासघाताने त्याला ठार मारिलें; तथापि राजश्री ही प्रतिबंधांतून सुटून विंध्यपर्वतति गेली, अशी हर्षास बातमी मिळाली; राज्यवर्धन यास पुत्र संतती नव्हती; त्यामुळे, त्याच्या मृत्युनंतर त्याचा धाकटा भाऊ हर्ष हा इ. सन ६०६ यावर्षी गादीवर आला; त्यानंतर लागलीच त्याने विंध्य पर्वतात आपली बहीण राजश्री हिचा पत्ता लावून तिला आपणावरोबर आपल्या घरी परत आणिलें. ही स्त्री मोटी विद्वान् असून बौद्ध धर्माच्या संमियत सांप्रदायांत फार निपुण होती; त्याप्रमाणेच राजकारण- विषयक बाबींचेंही तिला पुष्कळ ज्ञान होते; हर्ष राजाची ही विधवा बहीण त्याचबरोबर प्रसिद्ध चिनी धर्मगुरूंची व्याख्याने ऐकावयास बसत असे; धार्मिक वादविवादांत भाग घेत असे, इतकेंच नाहीं. तर राज्यकारभाराच्यः बाबतींतही ती आपल्या भावास नेहमीं सल्ला मसलत देत असून राजा हर्ष हाही . आपल्या बहिणीची या बाबतींत नेहमीं मदत घेत असे; या काळापर्यंत हिंदु स्त्रियांनां मुसलमानाप्रमाणे पढदा नसून, त्यानां मोकळेपणानें हिंडण्या- फिरण्याचे किती स्वातंत्र्य असे, व या काळांतही विद्वान व राजकारण कुशल