Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४९ )

कमजोर करून टाकले. या राज्यास ' लघु कुशन ' राज्य असे म्हणतात; या राज्यास लवकरच 'हूण' या नांवाचे मोंगल जातीचे शत्रू उत्पन्न झाले, व त्यांनी लघुकुशन लोकांची सत्ता नामशेष केली; यावेळीं त्यांचा पुढारी तोरणमल या नांवाचा एक पराक्रमी पुरुष असून तो आपल्या सैन्यासह थेट माळवा प्रांतांत शिरला होता; परंतु त्या ठिकाणी कुमारगुप्ताचा मुलगा स्कंधगुप्त यानें त्याचा पूर्णपणे पराभव करून त्यास सिंधुनदाच्या पलीकडे हांकडून दिलं. हूण लोकांवर मिळविलेल्या या जयाबद्दल त्याने एक मोठा स्तंभ उभारिला; व त्याच्या माथ्यांवर विष्णूची मूर्ति बसवून, त्याखाली ईश्वरकृपेनें या रानटी लोकांच्या तडाक्यांतून आपल्या देशाची कशी सुटका झाली, याबद्दलची हकीकत लिहिली... हा स्तंभ गाझीपूर जिल्ह्यांत काशीच्या पूर्वेस भीतरी ह्या गांवीं त्याच्या माथ्या- वरील विष्णुमूर्तिशिवाय अद्यापि तो अस्तित्वांत आहे.
 स्कंध गुप्तानंतर त्याचा सावत्र भाऊ पूरगुप्त व त्यानंतर त्याचा मुलगा नरसिंहगुप्त हा गादीवर आला. याच्या कारकीर्दीत तोरणमलचा मुलगा मिहि- रगुल यानें आपल्या हूण सैन्यासह पुन्हां हिंदुस्थानावर स्वारी केली, व माळवा प्रांत आपल्या अंमलाखाली आणिला; परंतु तो मोठा क्रूर, अनियंत्रित, व जुलुमी असल्यामुळे लवकरच अप्रिय होऊन त्याचे मध्य हिंदुस्थानचा राजा यशोधर्म अथवा यशोवर्धन याच्याशी वैर उत्पन्न झाले; आणि मध्य हिंदुस्थानांतील इतर राजेरजवाडे व मगध देशाचा राजा बालादित्य वगैरेंच्या मदतीनें त्यानें मिहिरगुल याचा पश्चिम माळव्यातील मंदोसर येथे पूर्णपर्णे पराभव करून त्यास पाडाव केले, व बालादित्याच्या मध्यस्थीनें त्याचे प्राण वांचून त्याची त्याच्या देशाकडे परत रवानगी करण्यांत भाली.
 हूण लोकांवरील या महत्वाच्या विजयप्राप्तीचे द्योतक म्हणून यशोवर्धन यानें मंदोसर येथे एक स्तूप उभारिला, व त्यावर "मो मिहिरगुल याच्या हाताखालील हूण सैन्याचा पूर्णपणे पराजय केला, इतकेंच नाहीं तर गुप्त साम्रा- ज्याच्या अमलाखालीं जेवढा प्रदेश होता, त्याहून अधिक व्यापक प्रदेशावर मी हल्लीं सार्वभौम सत्ता उपभोगीत आहे " असा लेख लिहून काढविला; या वेळेपासून त्यास “विक्रमादित्य" असे नामाभिधान प्राप्त झाले, व विक्रम मंत् सुरू झाला; (इ. १३३) त्यानंतर त्याने हळुहळू वर्चस्