Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४८ )



शतकांत युरोपात फ्रान्स देशांतील पारीस येथे अशा प्रकारचे पहिले 'मॉसोंधु यानावाचे औषधालय स्थापन करण्यात आलं आहे. म्हणजे अशी धार्मिक संस्था सुरू करण्याचा आद्य मान हिंदुस्थान देशास आहे. ही गोष्ट विशेष महत्त्वाची व लक्षांत ठेवण्यासारखी आहे.-" ह्या रुग्णालयांत निरनिराळ्या प्रकारचे रोग- ग्रस्त व गरीब रोगी व आजारी लोक औषधोपचार करण्याकरितां येतात, व तेथील वैद्यांच्या देखरेखीखालीं त्यांची त्या ठिकाण उत्तम सुश्रूषा ठेवण्यति येते. अशा लोकांपैकीं ज्याला औषध हवें असेल त्याला औषध, व अन्न हवें असेल त्याला अन्न, देण्याची तेथें उत्तम तजवीज ठेविलेली असते; व रोग- ग्रस्तांना हरएक प्रकारचे स्वास्थ्य लाभावें, म्हणून विशेष काळजी व खबरदारी घेण्यांत येत असते. व कोणत्याही रोगमुक्त झालेल्या मनुष्यास पाहिजे त्यावेळी रुग्णालय सोडून जाण्याची मोकळीक असते; " शिवाय, फॉ- एनच्या वर्णनावरून असेही कळून येतें कीं या गुप्त साम्राज्यांतील प्रजा फार सुखी असून तिला आपल्या साम्राज्य सरकाराकडून कोणत्याही प्रकारें त्रास होत नसे, व तें सरकार प्रजेच्या कारभारांत होता होईल तितका कमी हात घालीत असे; प्रजेनें आपापल्या परीने उद्योग करून संपन्न व्हावें, अशी राज्यव्यवस्था असे; परगांवीं जातांना परवाना घ्यावा लागत नसे, किंवा आपल्या घराची अथवा घरांतील माणसांची नोंध करावी लागत नसे. सरकारचें उत्पन्न बहुतेक जमीनी- पासून असून सरकारी नौकरांना सरकारांतून पगार मिळत असे; त्यामुळे त्यांच्याकडून रयतेला उपद्रव पोचत नसे; यावरून हा राज्यकर्ता किती श्रेष्ठ प्रतीचा होता, व पौर्वात्य दृष्टीनें म्हणा का पाश्चिमात्य दृष्टीनें म्हणा त्याची राज्य- व्यवस्था किती सुधारलेली, व सुव्यवस्थित होती, हे सहज निदर्शनास येतें.
 दुसरा चंद्रगुप्त ऊर्फ विक्रमादित्य हा इ० सन ४१३ मध्ये मृत्यू पावला, व त्याचा मुलगा कुमारगुप्त हा गादीवर आला; याची कारकीर्द विशेष मह- त्वाची नसून, या वेळेपासून गुप्त साम्राज्यसत्तेस ओहोटी लागण्यास सुरवात झाली. इ० सन २२६ नंतर — म्हणजे कुशान राज्याच्या नाशानंतर - कुशान लोकांनीं पुन्हा दोनशे वर्षांनीं इ० सन ४३० च्या सुमारास पूर्व अफगाणिस्था- नांमध्ये आपले राज्य स्थापन केलं, व हळुहळू हिंदुस्थानांतील काश्मीर व पंजाब हे प्रति आपल्या हस्तगत करून घेऊन आपला राज्यविस्तार, हिंदुस्थानांतील गुप्त साम्राज्याच्या सरहद्दीशीं आणून भिडविला, व त्यावर सारखे हल्ले करून तें