Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४७ )

ज्याच्या पाटलीपुत्र या राजधानींतच राहिला होता; व तेथें असतांना त्यानें तेथील बुद्ध मठांत संस्कृत भाषेचें उत्तम अध्ययन केलें होतें; त्यावेळी, महायान व हीनयान या दोन बौद्धधर्मीय प्रचाराचे मठ या राजधानीत असून त्या दोन्हींत मिळून अजमायें सातशे भिक्षू वास्तव्य करीत होते; दरवर्षी वैशाख शुद्ध अष्टमीस बुद्धमूर्तीचा एक मोठा समारंभ करण्यांत येत असे, व त्यावेळीं वीस मोठमोठ्या रथांवर बुद्धमूर्ति बसवून निरनिराळी वाद्ये वाजत्रीत त्यांची मोठ्या थाटानें नगरांत मिरवणूक काढण्यांत येत असे; फॉ-एन यानें या गुप्त साम्राज्याच्या तत्कालिन स्थितीचें जें मोठें मनोवेधक वर्णन केलें आहे, त्यांत तो म्हणतो:-" समुद्रगुप्ताच्या या साम्राज्यांतील प्रजेची स्थिति भरभ- - राटीची असून, त्यांतील प्रजाजन सुखी, संपत्तिमान् व सद्गुणी आहेत. व राज्यकारभारावरही त्यांचें बरेंच नियंत्रण आहे; ज्याची मर्जी असेल त्यानें साम्रा- ज्यांत रहावें, नसेल त्यांनीं खुशाल इच्छेस वाटेल त्या ठिकाणी राहण्यास जावें, भशी सर्वास सरसकट मोकळीक आहे. या साम्राज्यांत बहुतेक अपराधांना दंडाची शिक्षा असून देहांत शिक्षेची व गुन्हेगारास कायद्यानें हाल हाल करून ठार मारण्याची साम्राज्यभर चोहोंकडे सक्त मनाई आहे; तथापि निरढावलेल्या, व वारंवार कायद्याचे उल्लंघन करण्यास संवकलेल्या, गुन्हेगारांना मात्र, त्यांचा उजवा हात तोडण्याची शिक्षा देण्याची वहिवाट आहे; पण असा प्रसंगही कचि- - तूच येत असल्याचे निदर्शनास आले आहे; आणि साम्राज्यांतील प्रवासाचे मार्ग पूर्णपणे निर्भय व सुरक्षित आहेत. " फॉ- एन् याने या साम्राज्यांतील अंतर्भागांत पुष्कळ प्रवास केला; परंतु त्यास एक वेळाही चोरट्या लोकांकडून उप- द्रव पोहोंचला नाहीं; शिवाय या गुप्त साम्राज्यांत कसाईखाने नव्हते, दारू गाळण्याच्या भट्टया नव्हत्या, व कोंबडी. गाईं, व डुक्करें यांचा प्राणनाशही, मांसाच्या लोभानें कोणीही करीत नव्हते; त्याप्रमाणेंच या साम्राज्यांत कोणीही दारू पीत नाहीं, प्राणिहत्या करीत नाही;इतकेच नाहीं, तर कांदा लसूणही फारसा कोणी खात नाहीं, असें त्यास आढळून आलें होतें; फॉ- एन् हा आणखी असे म्हणतो की " या साम्राज्यांत पुष्कळ धर्मसंस्था असून पुष्कळ धर्मशाळाही बांधलेल्या आहेत, आणि खुद्द राजधानींच्या शहरांत श्रीमंत नागरिकांच्या देणग्यांवर एक धर्मार्थ औषधालयही चालू ठेवण्यांत आले आहे. "हिंदु- स्थानातील हे रुग्णालय स्थापन झाल्या नंतर पुढे दोनशे वर्षांनीं सातव्या