Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४६ )

डोंगराळ प्रांतांतील व्याघ्र राज्यकर्ता व गोदावरी तीरावरील पिष्टपूर येथील राज्यकर्ता यांना आपल्या नियंत्रणाखालीं आणून गंजम प्रांतांतील महेंद्रगिरी आणि कोतर हे डोंगरी किल्ले त्याने आपल्या स्वाधीन करून घेतले; त्या प्रमा- पेंच कोलेर सरोवराच्या काठावरील मंतराज राजाचा पराभव करून, कृष्णा व गोदावरी ह्या नद्यांच्या मधील प्रांत मिळवून घेऊन, कांची येथील पल्लव राजास आपल्या नियंत्रणाखालीं आणिले; आणि पश्चिमेकडे स्वारी करून पालक येथील पल्लव वंशीय उग्रसेन राजाचा पराभव केला; त्यानंतर तिकडून परत येताना तो देवराष्ट्र अथवा महाराष्ट्र देशांवर भाला व खानदेशातील एरंड पल्ल अथवा एरंडोल हा प्रांत त्यानें काबीज केला; त्याप्रमाणेच राजपुता- न्यांतील उत्तर भागांतील व दक्षिण व वायव्य दिशेकडील, इतर राजेरजवा- ड्यांवरही त्यानें आपलें महत्त्व प्रस्थापित केलें; थोडक्यांत म्हणजे, साम्राट अशोक याच्याप्रमाणेच समुद्रगुप्तानेही आपले विस्तृत साम्राज्य स्थापन केलें
 समुद्रगुप्त यार्ने, इ० सन ३४० च्या सुमारास, आपले चक्रवर्तित्व जाहिर करण्याकरितां अश्वमेध यज्ञ केला; असा यज्ञ हिंदुस्थानांत पुष्पमित्रानंतर कोणीही केलेला नव्हता. या यज्ञसमारंभाप्रीत्यर्थ समुद्रगुप्तानें नाणीं पाडविलीं होतीं; व त्यांवर होमकुंड, व त्यासमोर अश्व असे चित्र काढिलें होतें; साम्राट अशोक यानें अजमासे सहारों या वर्षी उभारलेल्या एका स्तंभावर, समुद्रगुप्तानें आपल्या पराक्रमाचें वर्णन खोदून काढविले असून तो स्तंभ इल्लीं अलाहाबाद उर्फ प्रयाग येथील किल्ल्यांत जतन करून ठेविला आहे. शिवाय हरिषेण कवीने या साम्राटाच्या कारकीर्दीचें वर्णन केलेले असुन हा साम्राट कवी व गायन-वादन - शास्त्र - विशारद असल्याचाही त्यांत उल्लेख केलेला आहे. हा पराक्रमी साम्राट इ० सन ३७५ या वर्षी मृत्यु पावला, व त्याचा, दत्तदेवी राणीपासून झालेला मुलगा दुसरा चंद्रगुप्त अथवा चंद्रगुप्त विक्र- - मादित्य - हा सिंहासनारूढ झाला.
 दुसरा चंद्रगुप्त हाही आपल्या वडिलांप्रमाणेच शूर असून त्याने बंगाल प्रांतावर स्वारी केली, व सौराष्ट्रांतील शक वंशाचा नाश करून तो प्रदेश व माळवा प्रांत आपल्या राज्यांत सामील केला. फॉ-एन, या नांवाचा एक चिनी बौद्ध धर्मानुयायी प्रवासी हिंदुस्थानांत आल्यानंतर त्याने या गुप्त साम्रा- ज्यांत सहा वर्षे वास्तव्य केले, आणि त्यांतील तीन वर्षे तर तो खुद्द गुप्त साम्रा-