Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४५)

कोरीव लेणी तयार करण्यांत आलीं. इ० सन ३०० पासून हिंदुकालास सुरवात होऊन इ. स. ३२० यावर्षी मगध देशांतील गुप्त घराणे उदयास आलें.
 इ. सन २८० च्या सुमारास गुप्त घराण्यानें मगध देशाची राजसत्ता आपल्या हस्तगत करून घेतली, व पाटलीपुत्र अथवा पाटणा में शहर आपल्या राजधानीचे ठिकाण केलें. या घराण्यांत चंद्रगुप्त या नांवाचा एक शूर राज्यकर्ता निर्माण झाला; त्याने लिचावी अथवा लिच्छवी वंशांतील राजकन्या कुमारी देवी हिजबरोबर विवाह केला. बहार, अयोध्या, तिरहुट, व प्रयाग, वगैरे प्रदे- शभर आपल्या राज्याचा विस्तार केला, व तो आपणास ' महाराजाधिराज अर्से म्हणवून घेऊ लागला; त्यानें आपली राणी कुमारी देवी हिच्या व तिच्या लिचावी घराण्याच्या नांवाची नाणी पाडिलीं, व ३० सन. ३२० या वर्षी ता. २६ फेब्रुवारी रोजी त्याने गुप्त शकाची स्थापना केली.

चंद्रगुप्त हा इ. सन ३३६ या वर्षी मृत्यु पावला व त्याचा अत्यंत पराक्रमी मुलगा समुद्रगुप्त हा गादीवर आला; त्यानें हुगळी नदीच्या पश्चिमे- कडील बंगालचा सर्व प्रदेश, गुजराथ प्रांत व थेट नर्मदा नदीपर्यंतचा प्रदेश, मध्यप्रांत, संयुक्त प्रांत, पंजाबचा बराच भाग वगैरे मुलूख आपल्या हस्तगत करून घेऊन हिंदुस्थानांत दुसरें साम्राज्य निर्माण केले; तो अत्यंत बलाढ्य असा राज्यकर्ता असुन त्याने दक्षिणेतील अकरा राजांचा व आपल्या राज्याच्या सरहद्दीवरील कित्येक राजेरजवाड्यांचा पराभव केला, ओरिसा या नांवाच्या


केलेला आहे, व त्यांतील शिलांवर निरनिराळे लेख कोरलेले आहेत; येथून जवळच बिसनगर या नांवाचें एक प्रसिद्ध शहर असून तें पूर्ण काळीं अत्यंत भरभराटीत होते; सांची येथे सांपडलेल्या अजमासें दोनों शिलालेखांची भाषांतरें झालेलीं आहेत, हा प्रदेश बटवा व बेस या नद्यांच्या पाण्याने भिजणारा व सुपीक असल्यामुळे बौद्ध धर्मानुयायी भिक्षु वगैरे मंडळी सांची व आसपास स्थाईक होऊन शेतकीचाही धंदा करीत असत. असे निदर्शनास येतें. सांची व त्यांच्या आसपासच्या कित्येक मैलांपर्यंतचा प्रदेश, यांमध्ये या धर्माचे अव- शेष अजूनही दृग्गोचर होत आहेत; व सांची येथे हल्लींही असलेल्या स्तूपाची योग्य काळजी व निगा ठेवण्यांत येत आहे. सांचो व भिलसा हीं ठिकाणे भोपाळच्या पलीकडे व झांसी ग्वाल्हेरच्या अलीकडे असून तीं रेलवे स्टेशनचीं गांव आहेत.