Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४४ )

या राष्ट्रकूटांपैकीं कलचुरी घराण्यानें चेदी उर्फ हल्लींचा वऱ्हाड व नागपूर प्रदेशाचा उत्तर भाग, या प्रदेशामध्ये आपले राज्य स्थापन केले; दक्षिणेकडील काही भाग कदंब घराण्याने आपल्या तात्र्यांत मिळविला, व बाणवंशी हे आपल्या राजधानीचे ठिकाण करून ते तिकडे स्वतंत्रपणे राज्य करूं लागले; त्याप्रमाणेच पल्लव या नांवाच्या तिसऱ्या एका शूर व प्रसिद्ध घराण्याने गोदावरी व कावेरी या दोन नद्यांमधील व्यापक प्रदेश आपल्या हस्तगत करून घेऊन त्यांनीं तिकडे आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले, व मद्रास जवळील 'कांचीपूर ' अथवा ' कांजीवरम् ' हैं शहर आपल्या राजधानीचे ठिकाण केलें. हे घराणे चवथ्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत विशेष बलिष्ठ व भरभराटींत होते; पुढे चालुक्य घराण्यांतील राजा आदित्यसेन यानें इ० सन ८८० ते इ० सन ९०७ पर्यंतच्या सत्तावीस वर्षांत पलवावर अनेक स्वाऱ्या केल्या, व त्यांच्या वाढत्या सत्तेवर भयंकर आघात करून त्यांचे राज्य नामशेष करून टाकिलें.
 या काळांत बौद्धधर्माची तत्वे लोकांच्या मनावर अधिक परिणामकारक होऊन तो धर्म व्यापक प्रमाणाने वृद्धिंगत झाला. गौतम बुद्धास ईश्वर मानून त्याच्या साकार प्रतिमा तयार करण्यांत येऊं लागल्या, व त्याबरोबरच दुसऱ्या देवता व दानव यांच्या प्रतिमा निर्माण करण्यांत येऊं लागून बुद्ध देवाचीं मंदिरें चोहोंकडे बांधण्यांत येऊं लागलीं; व त्या मंदिरांतून मोठमोठे उत्सव सुरू होऊन हिंदुधर्माच्या मानाने त्या धर्माची विशेषच महती वाहून गेली.

 बौद्धधर्माप्रमाणेच, या काळात वैद्यशास्त्राचीही अतीशय भरभराट झाली. प्रसिद्ध औषधी - शास्त्र - वेत्ते चरक व सुश्रुत यांनीं वैद्यशास्त्रावर विशेष उपयुक्त माहितीचे ग्रंथ निर्माण केले; व त्यापैकीं सुश्रुताच्या ग्रंथावर पुढे बौद्धधर्मानुयायी नागार्जुन यानें एक टीकात्मक ग्रंथ लिहिला. त्याप्रमाणेच इतर कित्येक कला- चित्रकला व शिल्पकला वगैरे ही या कालांत भरभराटीस आल्या; आणि कारेली (कारले) कान्हेरी दारहट, आणि साची वगैरे ठिकाणीं नामांकित


 * सांची हैं ठिकाण जी. आयू पी. रेलवेवर एक स्टेशनचे गांव आहे. हे ठिकाण शिंद्यांच्या राज्यांतील भिलसा ह्या शहरापासून दक्षिण दिशेस पांच मैलावर आहे; राजा अशोक यानें पुष्कळ स्तूप बांधिले, त्यापैकीं सांची येथील स्तुप हल्लींही कायम आहे. हे ठिकाण सांचीपासून अजमायें एक मैल-पंधरा मिनिटाच्या रस्त्यावर आहे. या स्तुपाभोंवतीं मोठा भर भक्कम दगडी कठडा .