Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४३ )

छानछोकीची आम्हांस इतकी जबरदस्त किंमत देणें भाग पडत आहे, " शिवाय, या बाबतींत रोम येथील टायबीरियस बादशहानें आपल्या सीनेटला. एक पत्र पाठविले असून त्यांत त्याने असें लिहिलें होतें कीं, 66 आपला मूळचा साधेपणा आपणांत कसा परत येईल ? आपल्या रोमन लोकांत कपड्यालत्या- संबंधाने जे नवेनवे चाळे निघाले आहेत ते बंद कशाने होतील ? आणि आपल्या बायकांमध्ये डामडौली चोजल्यांची व विशेषेकरून हिरे माणिकें, मोतीं, वगैरेंची जी हांव उत्पन्न झाली आहे, तिला कशाने आळा घालितां येईल ? ह्या सर्व चौचालपणाच्या ढंगामुळे आपल्या देशांतील संपत्ति हिंदुस्थानांत जाऊन त्या ऐवजी आपल्या देशांत नकली पदार्थ येत आहेत आणि याचा परिणाम असा झाला आहे की, आपल्या रोमन चलनी नाण्याची किंमत कमी होऊन शेवटी ते कोणीही येईनासे झाले आहे; " वरील विवेचनावरून हा प्रदेश किती संपन्न होता, व येथील व्यापारास केवढे महत्व प्राप्त झालें होतें, ही गोष्ट सहज लक्षांत येण्यासारखी आहे.
 आंध्रातील तिसरे राज्य शालिवाहन, हॅ असून त्या वंशांतील तेरावा पुरुषः शतकर्णी गौतमपुत्र हा पराक्रमी असून त्यानें इ. सन १२६ च्या सुमारास गुजराथचा नहपान क्षत्रप याचा पराभव केला; त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पुलुयामी वशिष्टापुत्र हा गादीवर आला. तोही आपल्या बापाप्रमाणेन मोठा शूर असून त्यानें आपल्या आंध्र राज्याची पुष्कळ भरभराट केली; परंतु त्याच्या मृत्यु- नंतर गादीवर आलेले राज्यकर्ते यशश्री, चतुरिपन व मधुरिपुत्र हे तीन राज्य-: कर्ते - दुर्बळ निघाल्यामुळे इ० सन २५०च्या सुमारास हे घराणे नामशेष झाले, . ब आंध्र राज्याचे निरनिराळे तुकडे पडले; त्यांना राष्ट्रकूट ' असे म्हणत.

 


+ "धी इंपीरियल गॅझेटियर" मध्ये दहा कोटी पौंडांपैकी हिंदुस्थानच्या वांटणीस साडे पाच कोटी सेस्टरशिया घातले आहेत, व त्याची किंमत ४५८००० ( चार लक्ष अठ्ठावन हजार ) पौंड धरिली आहे; तथापि एक सेस्टर सियमची किंमत २.१ पासून २.४ पेन्सपर्यंत धरिली जात असल्यामुळे वरील पौंडांची रक्कम अर्थातच पूर्णपणे बरोबर असावी, असे म्हणतां येत नाहीं.
 * मॉडर्न रिव्ह्यू' ह्या कलकत्ता येथे निघणाऱ्या इंग्रजी मासिक पुस्त -- काचा इ. सन. १९१३ च्या दिजंबर महिन्याचा अंक, पान ५६७ पहा.