Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४२ )

जिल्ह्यातील काईल उर्फ कन्याल हैं मोठें सुंदर व विस्तृत बंदर असून पश्चिमे कडून येणारी सर्व गलबतें या बंदरास येऊन लागतात. इकडील जमीनींत फक्त तांदूळच मुख्यतः उत्पन्न होतो, व हे लोकही इतर धान्य न पिकवितां हेंच धान्य पिकवितात. " केरळ प्रांताप्रमाणेच इतर ठिकाणच्या व्यापारविषयक बाबतींत त्यानें अर्से लिहिलें आहे कीं, " गुजराथ प्रांतांव सुंठ, मिरी, नीळ व कापूस हे जिन्नस पैदा होतात, व त्या प्रदेशांत उत्तम हांतऱ्या अथवा सतरंज्याही तयार करण्यांत येतात. त्याप्रमाणेच मुंबई नजीक ठाणे येथें सोनं, रूप, तार्चे, वगैरे धातू व इतर काहीं जिन्नस बाहेरून येतात, व कातडीं, कापूस व किंतान वगैरे जिन्नस तेथून बाह्यप्रदेशीं खाना होतात; आणि यांपैकीं उत्तम जातीचें किंतान तर बाह्यप्रदेशीं पुष्कळच रवान होते; प्रसिद्ध इतिहासकार लायल यानेही हिंदुस्थान देशाचा परदेशाबरोबर चालणारा दांडगा व्यापार व त्याचे अतीशय महत्त्व, आपल्या ग्रन्थांत मान्य केले असून इतर युरोपियन लेखकांनीं व प्रवाशांनींही, आपल्या लेखांत तशाच आशयाची कबूली दिली आहे; इतकेच नाहीं तर प्लिनी यानेही आपल्या " न्याचरल हिस्ट्री" या ग्रंथांत ( इ. सन ७७ च्या सुमारास) असें लिहिलें आहे कीं; “ रोमन साम्राज्यांतून दरसाल हिंदुस्थान व चीन देशांकडे जाणारा सुवर्णप्रवाह दहा कोटी सेस्टर- शियापेक्षां केव्हाही कमी नसे; आणि हा आंकडा हिंदुस्थान वगैरे देशांत त्यांच्या मालाच्या बदली रोमन साम्राज्यांतून जो माल जात असे, त्याची किंमत सोडून दिलेला आहे. ** शिवाय या बाबतींत आणखी विशेष लक्षांत ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे कीं, आपल्या मालाच्या बदल्यांत रोमन साम्राज्यांतून जो माल हिंदुस्थान वगैरे देशांतील व्यापारी मिळवीत त्या मालाची किंमत त्यांस शंभर पटीने अधिक येत असे. अशा रीतीनें रोमन साम्राज्यांतून सतत बाहेर जात असणाऱ्या सुवर्ण प्रवाहाला उद्देशून प्लिनी यानें असे उपहासदर्शक उद्गार काढले आहेत कीं, "आमच्या स्त्रियांच्या चोंचल्यांची व आमच्या


 * *पुस्तक ६ पान १०१; प्रसिद्ध ई. सन १९०६ मध्यें लिप्झीग एडिशन; (आवृत्ती ) मेहाफ; वरील आंकड्यांबद्दल एकमत नसून निरनिराळे उल्लेख आढळतात. काहींच्या मताप्रमाणे ५००x१०००००= पांच कोटी, हा आंकडा असून " इंपीरियल गॅझेटियर " मध्ये साडेपाच कोटी हा आंकडा दिलेला आहे.