Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )

बसालेम जिल्ह्यांत बानियंबादी, येथील खाणी अतीशय प्रसिद्ध असत; हे तीन 'म' कार - म्हणजे मिरीं मोतीं व माणकें हीं युरोपखंडात कोठेही पैदा होत नस- ल्यामुळे त्यांना तिकडे अतीशय मागणी असे, व युरोपांत त्यांची किंमत फार येत असे, हा किफायतीचा व महत्त्वाचा व्यापार मे महिन्यापासून आगस्ट महिन्या- पर्यंत, पावसाळयाच्या दिवसांशिवाय इतर आठ महिने, इराणचे आखात व तांबडा समुद्र या मार्गाने मोठ्या जोरानें व सारखा चालू असे; व या व्यापारामुळेच हिंदुस्था- नांतील या भागाचं व रोमचे विशेष दळण वळण जडून गेलेले असे. इ. स. पूर्वी २० यावर्षी प्रसिद्ध बादशहा ऑगस्टस सीझर हा रोमच्या सिंहासनावर आरूढ झाला, त्यावेळीं तामिली प्रदेशांतून त्याचे अभिनंदन करण्याकरिता एक मंत्रि- - मंडळ रवाना झालें होतें, असा दाखला आढळतो. शिवाय या प्रदेशांबरोबरील बरील जिनसांच्या व्यापाराचे इतकें महत्त्व असे कीं, इ. स. ४०९ या वर्षी गॉथ लोकांचा सरदार अलॉरिक यानें रोम शहरापासून जी खंडणी मागितली त्यांत तीन हजार रत्तल मिरीं द्यावी, हें एक महत्त्वाचें कलम होतें; त्या प्रमाणेच व्हेनिस येथील सरदार मॅरिनो सानीटा याने चवदाव्या शतकांत तामिली प्रदेशांतून चालणाऱ्या या व्यापारासंबंधीं असें लिहिलें आहे, की 'मोतीं, जवाहीर व मसाले, यांसारखे लहान आकाराचे पण मोठ्या किंमतीचे व्यापारी जिन्नस इराणी आखासांतील बंदरांतून व तैग्रीस नदींतून वर थेट बसरा येथे रवाना होत असत, व तेथून ते पुढें बगदाद येथें जात असत.” या काळात तामिली मुलुखांत अतीशय सुंदर असें तलम कापड तयार होत असे, आणि रोम येथें, व विशेषतः तेथील दरबारी मंडळींत, त्याचा अतीशय खप होत असे. त्यामुळें या प्रदेशांतील व्यापार इतक्या भरभराटीस आला, कीं, पहिल्या व दुसऱ्या शतकांत कांहीं रोमन व्यापायांनी तामिली प्रदेशांत येऊन तेथे आपल्या वसा- इती केल्या; व कांहीं तामिली राजांच्या नौकरींतही राहिले.
 तत्कालिन प्रसिद्ध प्रवासी मार्कोपोलो यानें इ० सन १२९२ मध्यें केरळ म्हणजे हल्लींच्या मलबार प्रांतांत प्रवास केला, त्यावेळीं तेथील लोकस्थिति व राहणी यासंबंधी त्याने असें लिहिले आहे कीं, " केरळ प्रांतांतील लोक आपल्या अंगावर एकच वस्त्र घेत असतात; त्यांच्यांत सती जाण्याची चाल असून ते गाईची पूजा करितात; ते घरांतील जमीनी गाईच्या शेणानें खारवितात, व जमीनीवरही बसतात; त्यांच्यांत सुपारी खाण्याची चाल आहे; तिनेवल्ली-