Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

अथवा मठ बांधविला होता; त्याप्रमाणेच त्याने एक प्रचंड तेरा मजल्यांचा बुद्ध मनोरा उभारिला होता. त्याची उंची अजमार्से चारशे फूट असून त्याच्या माथ्यावर एक लोखंडी मेघडंबरी होती, व त्याच्या शेजारी एक मोठा विहार तयार केला होता. या कनिष्कानें याकंद, काशगर व खोतान या प्रांतांवरही आपला अंमल बसविला असून पुरुषपूर उर्फ पेशावर हे त्याच्या राजधानीचें ठिकाण होतें; कनिष्कानें सतत लढाया करून पुष्कळ प्रदेश हस्तगत केला; व तीन दिशांच्या प्रांतांवर आपला अंमल सुरू केला; तथापि तो विशेष महत्त्वाकांक्षी असल्यामुळे चवथ्या दिशेच्या प्रांतावर स्वारी करून त्या टिकाणीं आपला अंमल स्थापित करण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. परंतु त्याचें सैन्य बाह्य प्रदेश त्यानें चालू ठेविलेल्या युद्धसत्रांत पूर्णपणे गुरफटून गेल्यामुळे अगदीं थकून व त्रासून गेलें होतें, व आपण देशीं केव्हा परत जाऊं, अशाबद्दल फार आतूर झालेले होते; त्यामुळे त्याच्या बरोबरील मंडळींनीं एक विचार करून त्यास ठार मारण्याचा बेत केला, व एके दिवशीं तो आजारी असतां त्यांनीं त्याच्या अंगावर रजई टाकून त्याचा कोंडमारा फेला, व त्याच स्थितीत एक मनुष्य त्याच्या तोंडावर बसवून त्याचा प्राण नाश करण्यांत आला !!
 कनिष्काच्या मृत्यूनंतर ( इ. सना पूर्वी १५२ च्या सुमारास ) त्याचे दोन मुलगे वशिष्क व हविष्क हे अनुक्रमें गादीवर आले; या उभयतांच्या अमलाखालीं काश्मीर काबूल व मथुरा हे प्रांत असून इविष्कानें काश्मीरमध्ये कपूर अथवा हलींचे हुकर है शहर वसविलें; त्याने आपल्या कारकीर्दीत नर्वे नाणे पाडले असून त्यावर ग्रीक, इराणी व हिंदु देवतांची चित्रे पाडिलों होती; त्यानंतर वसुदेव हा गादीवर आला; परंतु तो पूर्ण हिंदुधर्माभिमानी असून त्याने पाडिलेल्या नाण्यांवर शिव, नंदी, व त्रिशूल, यांची चित्रे काढ- लेली होती; या वसुदेवांनंतर कुशान वंशाचे राज्य लवकरच म्हणजे इ० सन २२५ मध्ये - नामशेष झाले.
 वरील कुशन वंशातील दुसऱ्या कडफीसने इंडो-पार्थियन लोकांचीं राज्य बुडविण्याचा उपक्रम केला, हो संधि साधून गुजराथ मधील पहिला क्षत्रप- नाहपान हा स्वतंत्र झाला, व काठेवाड, गुजराथपासून नाशिकपर्यंतच्या प्रदे- शावर त्याने आपला अंमल बसविला. ( इ. सन ७८. ) नाहपानाच्या मृत्यू- नंतर त्याचा जांवई उपवदात हा गादीवर आला; हा मोठा उदार व धर्मशील: